पंधरा ऑगस्ट चौकातून स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:15 AM2021-08-14T04:15:00+5:302021-08-14T04:15:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मध्यभागातील पंधरा ऑगस्ट चौकातून पुणे स्टेशनकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी शुक्रवारपासून (१३ ऑगस्ट) ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मध्यभागातील पंधरा ऑगस्ट चौकातून पुणे स्टेशनकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी शुक्रवारपासून (१३ ऑगस्ट) बंद करण्यात आला आहे. पंधरा ऑगस्ट चौकातून स्टेशनकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
सोमवार पेठेतील पंधरा ऑगस्ट ते नरपतगिरी चौक या रस्त्यावरून पुणे स्टेशनकडे वाहतूक जाते. महापालिकेकडून पंधरा ऑगस्ट चौक ते नरपतगिरी चौक दरम्यान, शुक्रवारपासून काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले आहे. पुढील आदेशापर्यंत या भागातून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविली आहे.
त्यानुसार, पंधरा ऑगस्ट चौकातून स्टेशनकडे जाणारी वाहतूक अपोलो चित्रपटगृह चौकातून सरदार मुदलियार रस्त्याने वळविण्यात येणार आहे. नगरपतगिरी चौकातून पंधरा ऑगस्ट चौकाकडे जाणारी वाहने नरपतगिरी चौकातून नेहरू रस्त्याने इच्छितस्थळी पोहोचतील.
---