माळीण फाट्याजवळचा रस्ता पावसामुळे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:34+5:302021-07-21T04:09:34+5:30

तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आहुपे खोऱ्यातील आदिवासी बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटावा यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या ...

The road near Malin Fateh is dangerous due to rain | माळीण फाट्याजवळचा रस्ता पावसामुळे धोकादायक

माळीण फाट्याजवळचा रस्ता पावसामुळे धोकादायक

Next

तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आहुपे खोऱ्यातील आदिवासी बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटावा यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून डिंभे ते आहुपे असा पंधरा कोटींचा निधी मंजूर करून घेतला. ह्या रस्त्याचे कामही अंतिम टप्प्यात असून काही ठिकाणी रस्त्याच्या साईडपट्ट्याच्या भरावाचे काम चालु आहे. परंतु आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यामध्ये सोमवारी दुपारी तीन वाजे पासून मुसळधार पावसाने सुरुवात केली असुन सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे आहुपे खोर्‍यामध्ये असणार्‍या माळीण फाट्या जवळ मुख्य रस्त्याला मोठा तडा जावुन हा रस्ता मोठ्या प्रमाणात खचला असल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या भागामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढु लागला आहे जर जोरदार पाऊस वाढला तर संपुर्ण रस्ता तुटुन पुढील माळीण, आमडे, पंचाळे, कोंढरे, भोईरवाडी, आहुपे, पिंपरगणे, आघाणे, डोण, न्हावेड, तिरपाड, असाणे, अशा बारा गावांचा संपर्क तुटण्याची भिती निर्माण झाली आहे. हा जर रस्ता मोठ्या प्रमाणात खचला तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होणार आहे. पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी या ठिकाणी जावुन पहाणी करुन सध्या तात्पुरता भराव करुन रस्ता वाहतुकी साठी चालु करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.त्याच प्रमाणे कायम स्वरुपी काॅंग्रेटची भिंत बांधण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत.

" स्थानिक शेतकर्‍यांनी हा रस्त्या कोरुन अत्यंत धोकादायक केला असुन काही शेतकरी साईड पट्ट्या भरावासाठी अडचण करत आहेत. साईड पट्टयांच्या कामासाठी शेतकर्‍यांनी हरकत करु नये जर हरकत झाली तर अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढेल ह्या साठी शेतकर्‍यांनी प्रशासनाला सहकार्य करावे. त्याच प्रमाणे ह्या साईड पट्ट्या भरण्यासाठी लागणारा पक्का मुरुम इकोसेन्सीटीव्ह झोन मुळे ह्या भागातुन काढण्यास परवानगी नाही.त्यामुळेही साईड पट्ट्या भरण्यास अडचण येत आहे साईट पट्ट्यि भराव न झाल्यास यामुळे रस्ता खचण्याचे प्रमाण वाढेल"

संजय गवारी

सभापती पंचायत समिती आंबेगाव

डिंभा ते आहुपे ह्या मुख्य रस्तावरील माळीण फाट्या जवळ नविनच बनविण्यात आलेला रस्ता खचला आहे ह्याची पहाणी करताना पंचायत समिती सभापती संजय गवारी

Web Title: The road near Malin Fateh is dangerous due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.