रांगोळीतून रस्ता सुरक्षेचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:39 AM2020-11-22T09:39:27+5:302020-11-22T09:39:27+5:30
पुणे : रस्ते अपघाताविषयी जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे वाहन चालविताना मोबाईलचा ...
पुणे : रस्ते अपघाताविषयी जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, सीटबेल्ट लावणे, हेल्मेटचा वापर आदी नियमांसदर्भात संदेश देण्यात आले.
जगभरात अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या स्मृतिनिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे व गुप्तचर विभागातील पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, संजय ससाणे, असोसिएशनचे राजू घाटोळे, एकनाथ ढोले यशवंत कुंभार आदी उपस्थित होते.
-------