रस्तारुंदीची सुनावणी हा महापालिका आयुक्तांचा फार्स : केसकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:12 AM2021-02-12T04:12:01+5:302021-02-12T04:12:01+5:30
पुणे : शहरातील ६ मीटर ते ९ मीटर रस्तारूंदीवरील सुनावणीसाठी महापालिकेतर्फे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला कोणतेही अधिकारपत्र न देता पाठविणे ...
पुणे : शहरातील ६ मीटर ते ९ मीटर रस्तारूंदीवरील सुनावणीसाठी महापालिकेतर्फे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला कोणतेही अधिकारपत्र न देता पाठविणे हे बेकायदेशीर असून, महापालिका आयुक्त हे पुणेकरांची दिशाभूल करीत आहेत़, असा आरोप माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी केला आहे़
याबाबत केसकर यांनी सांगितले की, आम्हा तिघांना सुनावणीसाठी गुरूवारी सकाळी ११ वाजता बोलविण्यात आले़ रस्त्याची प्रमाणरेषा निश्चित करण्याचा अधिकार हा कायद्यानुसार महापालिका आयुक्तांनाच असल्याने ही सुनावणी त्यांच्यासमोर होणे आवश्यक होते़ परंतु, कोणतेही अधिकारपत्र नसलेल्या कार्यकारी अभियंता जोशी यांच्याकडे आम्हाला सुनावणीसाठी पाठविले़
आजचा प्रकार पाहता आजपर्यंत झालेल्या सुनावण्या या कोणतेही अधिकार पत्र नसताना घेण्यात आल्या आहेत़ अशारितीने सुनावण्या घेऊन महापालिका आयुक्त बेकायदेशीर काम करून पुणेकरांची दिशाभूल करित असून, रस्तारूंदीची सुनावणी हा महापालिका आयुक्तांचा फार्स असल्याचे केसकर यांनी सांगितले़
--------------------------------