"रस्ता वापरणार म्ह्टल्यावर टोल भरावाच लागेल; चंद्रकांत पाटलांसारखी टोलमुक्ती आम्ही देणार नाही..!"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 08:07 PM2021-02-13T20:07:45+5:302021-02-13T20:27:56+5:30

सातारा रस्त्याचे काम मार्च अखेर पूर्ण होईल असे सांगतानाच या कामातल्या दिरंगाईला अ‍ॅक्सिस बॅंक जबाबदार : नितीन गडकरी

The road will have to pay toll; We will not give toll exemption like Chandrakant Patil | "रस्ता वापरणार म्ह्टल्यावर टोल भरावाच लागेल; चंद्रकांत पाटलांसारखी टोलमुक्ती आम्ही देणार नाही..!"

"रस्ता वापरणार म्ह्टल्यावर टोल भरावाच लागेल; चंद्रकांत पाटलांसारखी टोलमुक्ती आम्ही देणार नाही..!"

googlenewsNext

पुणे : रस्ता झाला आहे आणि त्याचा वापर करणार म्हटल्यावर टोल तर भरावाच लागेल. चंद्रकांत पाटलांसारखी टोलमुक्ती आम्ही देणार नाही. त्या कंत्राटदारांना अजुनही पैसे मिळाले नाही. पैसेच मिळाले नाहीतर काम कसे पूर्ण होणार या शब्दात केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत भूमिका स्पष्ट केली. 

पुण्यामध्ये आज नितीन गडकरी यांनी चांदणी चौक उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर त्यांनी शहरात होणारे इतर उड्डाणपुल आणि महामार्ग यावर भाष्य केले. सातारा रस्त्याचे काम मार्च अखेर पूर्ण होईल असे सांगतानाच या कामातल्या दिरंगाईला अ‍ॅक्सिस बॅंक जबाबदार असल्याचे नितीन गडकरी यांनी नमूद केले आहे. मात्र, सातारा हायवेसाठी अ‍ॅक्सिस बॅंकेकर्ड दिले होते. टोलची संपूर्ण रक्कम ते त्यांच्याकडे जमा करुन घेत होते. ती रक्कम कंत्राटदाराला दिलीच गेली नाही. यामुळे या सगळ्या कामाला उशीर झाला आहे. याबद्दल मी अ‍ॅक्सिस बॅंकेवर कारवाई करावी असे पत्र जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांना लिहिले आहे.

बॅंकेवर जरी कारवाई केली जाणार असली तरी कंत्राटदार असणाऱ्या रिलायन्सचं काय याबाबत विचारलं असता कारवाई केल्यावर कोर्ट केस होते आणि त्यात दिरंगाई होते. त्यामुळे कारवाई न करता काम पूर्ण करण्याकडे लक्ष असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले. या रस्त्यावर चार पुलांचे काम सुरु असून ते मार्च अखेर संपेल असा दावाही केला.

एकुणच तारीख पे तारीख मध्ये अडकलेल्या सातारा हायवेच्या कामाला आता अजुन एक नवी तारीख मिळाली आहे. आता या नव्या मुदतीत तरी काम पूर्ण होणार का पाहावे लागेल असेही यावेळी गडकरींनी स्पष्ट केले.  

सातारा रस्त्याचे काम मार्च अखेर पूर्ण होईल, असे सांगतानाच त्यांनी या कामातल्या दिरंगाईला अ‍ॅक्सिस बॅंक जबाबदार असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हणले आहे. सातारा हायवेसाठी अ‍ॅक्सिस बॅंकेकर्ड दिले होते. टोलची संपूर्ण रक्कम ते त्यांच्याकडे जमा करुन घेत होते. ती रक्कम कंत्राटदाराला दिलीच गेली नाही. यामुळे या सगळ्या कामाला उशीर झाला आहे. याबद्दल मी अ‍ॅक्सिस बॅंकेवर कारवाई करावी असे पत्र जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांना लिहिले आहे.

बॅंकेवर जरी कारवाई केली जाणार असली तरी कंत्राटदार असणाऱ्या रिलायन्सचं काय याबाबत विचारलं असता कारवाई केल्यावर कोर्ट केस होते आणि त्यात दिरंगाई होते. त्यामुळे कारवाई न करता काम पूर्ण करण्याकडे लक्ष असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले. या रस्त्यावर चार पुलांचे काम सुरु असून ते मार्च अखेर संपेल असा दावाही केला.

Web Title: The road will have to pay toll; We will not give toll exemption like Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.