रोड रोमिओंवर आता दामिनी पथकाचा वॉच, निर्भया पथकाबरोबर करणार विद्यार्थी महिलांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:47 AM2017-09-22T00:47:00+5:302017-09-22T00:47:21+5:30

महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बारामती शहरात निर्भया पथकापाठोपाठ आता आणखी दोन पोलीस पथक कार्यान्वित झाले आहेत. दामिनी आणि बीट मार्शल अशी या पथकांची नावे आहेत.

Road women are now protected from Damini Squad's watch, Nirbhaya squadak will protect student women | रोड रोमिओंवर आता दामिनी पथकाचा वॉच, निर्भया पथकाबरोबर करणार विद्यार्थी महिलांचे संरक्षण

रोड रोमिओंवर आता दामिनी पथकाचा वॉच, निर्भया पथकाबरोबर करणार विद्यार्थी महिलांचे संरक्षण

Next

बारामती : महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बारामती शहरात निर्भया पथकापाठोपाठ आता आणखी दोन पोलीस पथक कार्यान्वित झाले आहेत. दामिनी आणि बीट मार्शल अशी या पथकांची नावे आहेत. या पथकांना स्वतंत्र दुचाकी देण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांच्या संकल्पनेतून ही पथके जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्यांत सध्या कार्यरत आहेत.
पोलीस अधिक्षकांच्या संकल्पनेतून कार्यान्वित असलेल्या या पथकाला खास पथकाचे नाव असणा-या ‘डीझाईन’ केलेल्या दुचाकी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या खास दुचाकींवर जाणारे हे पथक बारामतीकरांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.
रहदारीच्या ठिकाणांसह महाविद्यालय परिसर, गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असणा-या भागात या पथकाचे ‘पेट्रोलिंग’ सुरू आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव म्हणाले, चोरी, लुटमार, छेडछाड आदी प्रकार रोखण्यासाठी तसेच तातडीने घटनास्थळी पोहचून गुन्हेगारांना जेरबंद करणे यासाठी या पथकाला दुचाकी देण्यात आल्या आहेत.
बीट मार्शल पथकामध्ये एकूण १० पोलीस कर्मचारी कार्यान्वित आहेत. यामध्ये दिवसा पाच व रात्री पाच कर्मचारी शहरात गस्त घालणार आहेत. बीट मार्शल पथकाला दोन दुचाकी देण्यात आल्या आहेत. शिवाय या पथकाकडे प्रथमोपचार पेटी, वॉकीटॉकी तसेच ‘नाईट राउंड’साठी बॅटरी देण्यात आली आहे. सकाळी ९ ते रात्री ९, रात्री ९ ते सकाळी ९ दरम्यान प्रत्येकी १२ तास ‘आॅन ड्युटी’ हे पथक कार्यरत असणार आहे. संशयित वस्तू, व्यक्ती, गर्दी, भांडणे, अपघात, महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासाठी
या दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाला देखील स्वतंत्र मोबाईल, वॉकीटॉकी देण्यात आला आहे. दामिनी
पथकाची दुचाकी पाहुनच रोडरोमिओ पळ काढतात. सध्या या पथकाचा रोडरोमिओंनी चांगलाच धसका घेतला आहे. महाविद्यालयीन युवतींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी संबंधित महाविद्यालयाचे प्रमुख, प्राध्यापक यांना पथकाचे व्हिजिटिंग कार्ड देण्यात आले आहे. त्यावर मोबाइल क्रमांकासह ई-मेल आयडी नमूद करण्यात आला आहे, असे दामिनी पथकाच्या स्वप्ना पोतेकर यांनी सांगितले.
>पोलीस कंट्रोल रूमची बीट मार्शल, दामिनी पथकावर नजर
बीट मार्शल, दामिनी पथकाला तातडीने गुन्ह्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी दुचाकी देण्यात आल्या आहेत. या दुचाकी खास डिझाईन करण्यात आल्या आहेत. सध्या शहरात कुठेही उभी केलेली ही दुचाकी पाहिली तरी रोडरोमिओ पळ काढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी बसलोय याचे भान न ठेवता बसणारी ‘कपल’देखील याला अपवाद नाही. या पथकाच्या दुचाकीला ‘जीपीएस ट्रॅकर’ बसविण्यातआला आहे. या पथकातील कर्मचा-यांवर ‘कं ट्रोल रूम’ची नजर राहणार आहे, अस सूत्रांनी सांगितले.
>तासाला समजणार ‘मोबाइल लोकेशन’
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या या पथकाला स्वतंत्र मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत.
प्रत्येक तासाला या पथकातील कर्मचा-यांचे ‘मोबाइल लोकेशन’ पुणे पोलीस कंट्रोल रूमला समजणार आहे.

Web Title: Road women are now protected from Damini Squad's watch, Nirbhaya squadak will protect student women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.