विमानतळ परिसरातील रोडच्या कामांना प्राधान्य, वाहतूककोंडी टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:35 AM2019-02-08T01:35:00+5:302019-02-08T01:35:31+5:30

विमानतळ परिसरात होत असलेल्या वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी सिम्बायोसिसकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याबाबत पुणे शहर पोलीस व पालिकेच्या समन्वय बैठकीत निर्णय घेण्यात आला.

Road work in the airport area, priority will be avoided | विमानतळ परिसरातील रोडच्या कामांना प्राधान्य, वाहतूककोंडी टळणार

विमानतळ परिसरातील रोडच्या कामांना प्राधान्य, वाहतूककोंडी टळणार

Next

पुणे - विमानतळ परिसरात होत असलेल्या वाहतूककोंडीवर उपाययोजना करण्यासाठी सिम्बायोसिसकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याबाबत पुणे शहर पोलीस व पालिकेच्या समन्वय बैठकीत निर्णय घेण्यात आला़. पोलीस आयुक्त डॉ़ के़ व्यंकटेशम, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली शहर वाहतूक शाखा व महापालिकेचे विभागप्रमुख यांची तिसरी मासिक समन्वय बैठक पोलीस मुख्यालयात बुधवारी झाली. 


वाहतूककोंडी टाळण्यासाठी विमानतळातील पार्किंगमधून बाहेर पडल्यावर सिम्बायोसिसकडे जाणाºया रस्त्याचे काम होणार असून त्याचे काम १५ ते २० टक्के पूर्ण झाले आहे़ हा रस्ता लवकर पूर्ण झाल्यास विमानतळावर येणाºया व तेथून बाहेर पडणाºयांसाठी एकेरी मार्ग करणे शक्य होईल.


बैठकीत पुणे रेल्वे स्टेशन, नगर रोड, सातारा रोड, मंडई, कोंढवा, येरवडा, कोरेगाव पार्क, लष्कर, हडपसर, चतु:शृंगी, बाणेर रोड, स्वारगेट, कात्रज, सिंहगड रोड या भागाकडे वाहतुकीस अडथळा होणारे अतिक्रमण काढणे, डिव्हायडर दुरुस्ती, सिग्नल दुरुस्ती करणे, बेवारस वाहनांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, पुणे महापालिका व पोलीस विभाग भूसंपादन करायच्या जागेचे हस्तांतर तसेच पादचाºयांची सुरक्षा व अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर चर्चा झाली़
बैठकीला पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र जगताप, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त माधव जगताप, उपायुक्त अनिल मुळे, माधव देशपांडे, जयंत भोसेकर, मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर उपस्थित होते़

विमानतळ परिसरात येणारे व जाणाºयांसाठी एकच रोड असल्याने या भागात नेहमीच वाहतूककोंडी होते़ त्यावर उपाययोजना करताना विमानतळातील पार्किंगमधून बाहेर पडल्यावर सिम्बायोसिसकडे जाणाºया रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला़
सध्या या रस्त्याचे काम १५ ते २० टक्के पूर्ण झाले आहे़

Web Title: Road work in the airport area, priority will be avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.