नळस्टॉप चौकातील पदपथासह रस्त्याची कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:28 AM2020-12-12T04:28:05+5:302020-12-12T04:28:05+5:30

पुणे : नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाण पुलाचे काम सुरू असतानाच, पावसाळ्यापूर्वीच ड्रेनेज लाईन/पावसाळी गटारे तथा पदपथ व रस्त्याच्या कामे ...

Road works along the sidewalk at Nalstop Chowk will be completed by the end of February | नळस्टॉप चौकातील पदपथासह रस्त्याची कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण करणार

नळस्टॉप चौकातील पदपथासह रस्त्याची कामे फेब्रुवारीअखेर पूर्ण करणार

Next

पुणे : नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाण पुलाचे काम सुरू असतानाच, पावसाळ्यापूर्वीच ड्रेनेज लाईन/पावसाळी गटारे तथा पदपथ व रस्त्याच्या कामे पूर्ण होतील़ असे आश्वासन मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिली़

नळस्टॉप येथील मेट्रोच्या कामांचे व खालील रस्त्यांवरील अडचणींबाबत, मेट्रो व मनपा अधिकाऱ्यांनी नुकतीच संयुक्त पाहणी करण्यात आली होती़ यामुळे येथील कामाला वेग आला असून, फेब्रुवारीअखेर पावसाळी गटारे व पदपथासह इतर कामे पूर्ण होतील असे नियोजन करण्यात आले आहे़ या पाहणीत संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, मेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे, मनपा पथ विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष तांदळे, मलनिस्सारणचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, अभिजीत डोंबे आदी अधिकारी उपस्थित होते़

यावेळी झालेल्या चर्चेनुसार, मेट्रोच्यावतीने एस एन डी टी ते नळस्टॉप या दरम्यान ४ मीटरचा रस्ता,किमान २ मीटर कमाल ३ मीटरचा पदपथ करण्याबरोबरच कर्वे रस्त्यावर दोन्ही बाजूस ९०० मि.मी व्यासाची पावसाळी लाईन टाकण्यास मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मान्यता दिली़

--------------------------

फोटो मेल केला आहे़

Web Title: Road works along the sidewalk at Nalstop Chowk will be completed by the end of February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.