पूर्व हवेलीत रस्त्यांची कामे संथगतीने, तर काही अर्धवट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:10+5:302021-03-08T04:12:10+5:30
थेऊर फाटा ते लोणी कंद या अष्टविनायक महामार्गात समाविष्ट केलेल्या रस्त्याचे काम थेऊर फाटा ते कोलवडीपर्यंत कोणत्याही कार्यवाहीविना ...
थेऊर फाटा ते लोणी कंद या अष्टविनायक महामार्गात समाविष्ट केलेल्या रस्त्याचे काम थेऊर फाटा ते कोलवडीपर्यंत कोणत्याही कार्यवाहीविना पडून आहे. तर उर्वरीत ठिकाणी एका मार्गिकेचे काम सुरू करून हे काम संथ गतीने अर्धवट स्थितीत आहे. बेल्हा - जेजुरी - पाबळ रस्त्याची अवस्था यापेक्षा वेगळी नाही, या रस्त्यांची कामे संबंधित ठेकेदाराने सब ठेकेदाराला दिल्याने कोरेगाव मूळ ते पिंपरी सांडस तर उरुळी कांचन ते शिंदवणे दरम्यान रस्ता पूर्णपणे अर्धवट राहिला आहे. रस्त्याची एकाच मार्गिकेवर खडी आंथरल्याने हा रस्ता नागरिकांना अतिशय जिकिरीचा झाला आहे. तीन वर्षे उलटून या रस्त्यांच्या कामांना निधी न मिळून खोळंबा झाल्याने या मार्गे सर्व प्रवाशी अतिशय संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.
बेल्हा ते पाबळ या रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपात आहे हे मान्य आहे. या रस्त्याच्या कामांना राज्य सरकारकडून निधी मिळत नसल्याने टप्प्या टप्प्याने हे काम सुरू आहे. सध्यस्थितीत २२% इतक्या प्रमाणात काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यांच्या कामांना निधी मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रयत्नशील आहे.
- सतीश नगराळे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे.