रस्त्यांची चाळण.. तुटलेली खेळणी

By Admin | Published: November 26, 2014 12:07 AM2014-11-26T00:07:11+5:302014-11-26T00:07:11+5:30

खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाचा वॉर्ड क्र. 6 हा खुल्या वर्गासाठी असून एकूण 46क्8 मतदारांचा यामध्ये समावेश होतो.

Roadmap .. broken toys | रस्त्यांची चाळण.. तुटलेली खेळणी

रस्त्यांची चाळण.. तुटलेली खेळणी

googlenewsNext
सर्वजित बागनाईक ल्ल खडकी
खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाचा वॉर्ड क्र. 6 हा खुल्या वर्गासाठी असून एकूण 46क्8 मतदारांचा यामध्ये समावेश होतो. यंदाच्या निवडणूक वॉर्ड फेररचनेतील सोडतीमध्ये हा वॉर्ड महिलांसाठी राखीव घोषित करण्यात आला. रेंजहिल्स परिसराचा बहुतांश् भाग हा वॉर्ड 6 मध्ये समाविष्ट होतो. संरक्षण, कामगार क्षेत्रतील वसाहतींचा भाग म्हणजेच बी टाईप, डी टाईप, एच टाईप, ई टाईप, टी टाईप, टू टाईप तसेच अन्य इमारतींमधील काही लहान भागाचा वॉर्ड 6 मध्ये समावेश होतो.
वॉर्ड 6 मध्ये सर्व प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. आरोग्याचा प्रश्न सतत गंभीर होत चालला आहे. येथील अनेक प्रकल्प बंद असून, आर्थिक उत्पन्न असलेला कत्तलखान्याकडेच सर्वाचे लक्ष आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे परिसरातील सर्व घरांची अवस्था ही अत्यंत खराब अवस्थेत आहे. याची देखभाल संरक्षण कामगार विभागाच्या वतीने करण्याचा देखावा केला जातो. मूळात मात्र, समस्या जशाच्या तशाच आहेत. 
येथील रहिवाशांचा सर्वात निकडीचा प्रश्न म्हणजे घरांची अवस्था हा आहे. घराभोवती वाढलेल्या गवतामुळे साप सापडण्याचे प्रकार येथे सतत घडतात. इमारतींना तडे गेल्याने धोकादायक झाली आहे. दरवाजे, खिडक्या, जीना, छत, पाण्याची टाकी यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. पाण्याची पाईपलाईन आहे. परंतु, त्यास पाणी नाही. पाण्याची टाकी आहे परंतु, ती सडक्या अवस्थेत आहे. पाणी भरल्यावर पाणी थांबविण्याचा कॉक नाही. बाथरुमला ड्रेनेज सिस्टिम आहे, परंतु, ती तुटलेल्या अवस्थेत आहे. बहुतांश जुन्या इमारतीचा भाग कधीही ढासळू शकतो अशाच अवस्थेत आहे.
संरक्षण विभागाने येथे दुर्लक्षच केले आहे. परंतु, बोर्डाच्या माध्यमातून आवाज उचलण्याचा प्रयत्न झाला नाही. लष्करी अधिका:यांमार्फत येथील समस्या बोर्डात मांडल्या गेल्या नाही. शिवाय वरिष्ट पातळीवरसुद्धा त्या सोडविण्याच्या दृष्टिाकोनातून विशेष प्रयत्न झाल्याचे दिसले नाही. रस्ता दुरुस्ती, सार्वजनिक, शौचालये, स्वच्छता आरोग्याशी संबंधित इतर सुविधा येथे मिळत नाही. अवजड वाहनांचा धोका कायम आहे. बोर्ड प्रवेशकराच्या माध्यमातून उत्पन्न घेत आहे. परंतु, रस्ता दुरुस्तीसाठी मालकीचा वाद उद्भवत आहे. बोर्डाने यासाठी संरक्षण खात्यात पाठपुरावा करणो गरजेचे आहे. परंतु, इच्छाशक्तीचा अभाव सातत्याने दिसून आला आहे. जलवाहिनी काही ठिकाणी फुटलेली असून, ड्रेनेजलाईनसुद्धा त्याच ठिकाणाहून गेलेली आहे. यामुळे रोगराईचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. या भागात कोणतेही विकासकाम करावयाचे झाल्यास त्यास संरक्षण विभागाचे ना हरकत पत्र मिळवावे लागते. परंतु, बोर्डाच्या हद्दीत राहणा:या नागरिकांचा विकास या पत्र प्रपंचामुळे खुंटला आहे. खरे तर इथे लोकप्रतिनिधी नावापुरतेच आहेत. खर नियंत्रण लष्करी अधिका:यांचेच आहे.
दरम्यान हा वॉर्ड दुर्लक्षित राहिल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या वॉर्डातील समस्या प्रभावीपणो मांडण्यात आल्या नाहीत. तसेच बोर्डानेही त्याकडे विशेष लक्ष दिलेले नाही. शिवाय वरिष्ट पातळीवरसुद्धा त्या सोडविण्याच्या दृष्टिाकोनातून विशेष प्रयत्न झाल्याचे दिसले नाही. रस्ता दुरुस्ती, सार्वजनिक, शौचालये, स्वच्छता आरोग्याशी संबंधित इतर सुविधा येथे मिळत नाही. 
त्यामुळे विकासापासून हा वॉर्ड दूरच राहिला आहे. त्यामुळे या वॉर्डातील नागरिकांना विविध सुविधांची प्रतीक्षा आहे. या भागातील जलवाहिन्या तुटल्या असल्याने रोगराईचे प्रमाण वाढले आहे.
येथे नियंत्रण हे अधिका:यांचेच असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींना विकासासाठी वाव मिळत नाही. (प्रतिनिधी)
 
वॉर्ड क्र. 6 मध्ये बोर्डाने 5 वर्षे दुर्लक्षच केले. आरोग्याशी संबंधित सर्व बाबींमध्ये बोर्ड अपयशी ठरले आहे. नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्यात लष्कराचासुद्धा मोठा हात आहे. प्रत्येक कामात दिरंगाई, चालढकलपणा, बेजबाबदारी जनतेसमोर आली. आम्ही लोकसहभागातून डेंगी, चिकनगुनिया, हिवताप या आजारांवर उपाय म्हणून औषध फवारणी घडवून आणली. जड वाहन बंदीसाठी आंदोलने केली. रस्ता, पाणी मुलभूत सुविधांसाठी कॅन्टोन्मेंटच जबाबदार असून, आरोग्य विभाग कुचकामी ठरला आहे.
- कैलास पहिलवान
 
4वॉर्डातील उद्यानात तुटलेली खेळणी तशाच अवस्थेत आहे. त्यामुळे लहान मुलांना त्यापासून धोका उत्पन्न होऊ शकतो. उद्यान परिसरात मद्यपींचा अड्डा बनला आहे. भौगोलिकदृष्टय़ा मोठा परिसर सुटसुटीत असल्याने अनेक ठिकाणी झाडाझुडपात दारुंच्या बाटल्या सापडतात. तरुणाईचे भविष्याचे धोरण ठरविण्यात अपयश आल्याचे चित्र आहे. शैक्षणिक व क्रीडा धोरण राबविले गेलेच नाही. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. या वॉर्डात विकासाभिमुख एकही निर्णय झाला नाही. आणि जर एखादा छोटा मोठा झाला असेल तर त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र आहे.

 

Web Title: Roadmap .. broken toys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.