शिरूरच्या पुर्वभागात रस्ते खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:28 AM2020-12-04T04:28:49+5:302020-12-04T04:28:49+5:30

भीमा नदी वरून शेतकरी वर्गाने शेतीस पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन ही रस्ते खोदून नेल्यामुळे पाण्याच्या दाबामुळे व विजेच्या अनियमितपणामुळे पाईप ...

The roads in the east of Shirur are paved | शिरूरच्या पुर्वभागात रस्ते खड्डेमय

शिरूरच्या पुर्वभागात रस्ते खड्डेमय

googlenewsNext

भीमा नदी वरून शेतकरी वर्गाने शेतीस पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन ही रस्ते खोदून नेल्यामुळे पाण्याच्या दाबामुळे व विजेच्या अनियमितपणामुळे पाईप लाईन लिकेज होत आहे. त्याचप्रमाणे वरदवीनायक हॉस्पिटलच्या समोर रस्त्याला मोठेमोठे खड्डे पडलेले असून या खड्ड्यातून प्रवासी वर्गाला रस्त्याची वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खडी ही इतरत्र विखुल्यामुळे हा भाग दलदली मुळे पूर्णपणे खचलेला आहे. या भागात सहकारी साखर कारखाने खाजगी साखर कारखाने व ऊस गुऱ्हाळ यांची ऊस वाहतूक या रस्त्याने चालू असल्यामुळे हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो. शिरूरच्या पुर्वभागात खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.

रस्त्यावर पाईपलाईन लिकेज झाली असता अनेक शेतकऱ्यांचे पाईप लाईन खोदाई चारीतून एकत्र गेलेली असते. परंतु हे लि केज माझे नाही तु झे आहे तू काढून घे अशी भावना असल्यामुळे माझे तुझे करण्याच्या वादात रस्त्याची पूर्णपणे वाट लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

मांडव गण फराटा हे गाव शिरूरच्या पुर्वभागात तील आर्थिक विकासाच्या दृष्टीने सर्वात मोठी बाजारपेठ निर्माण झालेली आहे. या भागात शैक्षणिक संस्था कॉलेज महाविद्यालय हॉस्पिटल छोटे मोठे लघु उद्योग यामुळे गाव विकासाच्या प्रगतीपथावर आहे. या भागातील रस्त्यांचे रुंदीकरण होऊन बांधकाम विभागाने खड्डेमय रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी.

--

--

Web Title: The roads in the east of Shirur are paved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.