विसर्जनानिमित्त मध्यभागातील रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद; जाणून घ्या बंद रस्ते अन् वळवलेले मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 10:35 AM2023-09-27T10:35:41+5:302023-09-27T10:35:51+5:30
शहरातील प्रमुख रस्ते गुरुवारी सकाळी सातनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार
पुणे : एक दिवसावर येऊन ठेपलेल्या विसर्जन मिरवणुकीनिमित्त गुरुवारी (दि. २८) मध्यभागातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यावर विसर्जन मार्ग तसेच मध्यभागातील रस्ते शुक्रवारी वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. शहरातील प्रमुख रस्ते गुरुवारी सकाळी सातनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ ते २९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणूक ज्या मार्गाने जाणार आहे, तेथील उपरस्ते बांबूच्या साहाय्याने बंद केले जाणार आहेत.
बंद असणारे रस्ते..
१) शिवाजी रस्ता : काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक
२) लक्ष्मी रस्ता : संत कबीर चौक ते टिळक चौक
३) बाजीराव रस्ता : बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक
४) कुमठेकर रस्ता : टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
५) गणेश रस्ता : दारूवाला पूल ते जिजामाता चौक
६) केळकर रस्ता : बुधवार चौक ते टिळक चौक
७) टिळक रस्ता : जेधे चौक ते टिळक चौक
८) शास्त्री रस्ता : सेनादत्त चौकी चौक ते टिळक चौक
९) जंगली महाराज रस्ता : झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक
१०) कर्वे रस्ता : नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक
११) फर्ग्युसन रस्ता : खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट
१२) भांडारकर रस्ता : पी.वाय.सी. जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक
१३) पुणे सातारा रस्ता : व्होल्गा चौक ते जेधे चौक
१४) सोलापुर रस्ता : सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक
१५) प्रभात रस्ता : डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक
१६) बगाडे रस्ता : सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक
१७) गुरू नानक रस्ता : देवाजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक
वळवलेले मार्ग..
१) जंगली महाराज रस्ता : झाशी राणी चौक
२) शिवाजी रस्ता : काकासाहेब गाडगीळ पुतळा
३) मुदलीयार रस्ता : अपोलो टॉकीज / दारूवाला पूल
४) लक्ष्मी रस्ता : संत कबीर पोलिस चौकी
५) सोलापूर रस्ता : सेव्हन लव्हज चौक
६) सातारा रस्ता : व्होल्गा चौक
७) बाजीराव रस्ता : सावरकर पुतळा चौक
८) लाल बहादूर शास्त्री रस्ता : सेनादत्त पोलिस चौकी
९) कर्वे रस्ता : नळस्टॉप
१०) फर्ग्युसन कॉलेज रस्ता : गुडलक चौक
असा असेल रिंग रोड..
कर्वे रस्ता - नळस्टॉप चौक - लॉ कॉलेज रस्ता - सेनापती बापट रस्ता - सेनापती बापट रोड जंक्शन - गणेशखिंड रस्ता - सिमला ऑफिस चौक - संचेती हॉस्पिटल चौक - इंजिनिअरिंग कॉलेज चौक - आंबेडकर रोडवरील शाहीर अमर शेख चौक - मालधक्का चौक - बोल्हाई चौक - नरपतगिरी चौक - नेहरू रस्त्यावरून संत कबीर पोलिस चौकी - सेव्हन लव्हज चौक - वखार महामंडळ चौक - शिवनेरी रस्त्यावरून गुलटेकडी मार्केटयार्ड - मार्केटयार्ड जंक्शन - सातारा रस्त्याने व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण सिनेमा) - सिंहगड रस्त्याने मित्रमंडळ चौक - सावरकर चौक - सिंहगड रस्ता जंक्शन - लाल बहादूर शास्त्री रस्त्याने सेनादत्त पोलिस चौकी - अनंत कान्हेरे पथावरून म्हात्रे पूल ते नळस्टॉप.
या ठिकाणी नो पार्किंग..
१) लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौक ते टिळक चौक
२) केळकर रस्ता - बुधवार चौक ते टिळक चौक
३) कुमठेकर रस्ता - शनिपार चौक ते टिळक चौक
४) टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक
५) बाजीराव रस्ता - पुरम चौक ते फुटका बुरूज चौक
६) शिवाजी रस्ता - गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
७) शास्त्री रस्ता - सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक
८) जंगली महाराज रस्ता - झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक
९) कर्वे रस्ता - नळस्टॉप ते खंडोजी बाबा चौक
१०) फर्ग्युसन कॉलेज रस्ता - खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक