किरकटवाडी, कोल्हेवाडी येथील रस्ते गेले खड्ड्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 04:02 AM2018-08-23T04:02:00+5:302018-08-23T04:02:21+5:30

खडकवासला ग्रामस्थ आणि मनसेचा आंदोलनाचा इशारा

The roads in Kirkwadi, Kolhevadi have gone into the pits | किरकटवाडी, कोल्हेवाडी येथील रस्ते गेले खड्ड्यात

किरकटवाडी, कोल्हेवाडी येथील रस्ते गेले खड्ड्यात

googlenewsNext

खडकवासला : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी ते कोल्हेवाडी, खडकवासलापर्यंतचा रस्त्यावरील खड्ड्यात पाण्याची डबकी, राडारोडा साठून हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी; अन्यथा रविवारी (२६ आॅगस्ट) रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा खडकवासला ग्रामपंचायत आणि मनसेने दिला आहे.
कोल्हेवाडी फाट्यावरील केंद्रीय जलसंशोधन केंद्राच्या आवारातील कॅनरा बँकेच्या प्रवेशद्वारातच पाण्याचे मोठे तळे साठले आहे.
किरकटवाडी फाट्यावरील जयप्रकाश नारायण नगरसमोरील रस्त्याची मोठमोठे खड्डे पडून चाळण झाली आहे. अशीच स्थिती नांदेड फाट्यावरील तसेच खडकवासला धरणमाथ्यावरील रस्त्याची झाली आहे. पाण्याची डबकी साठलेल्या खड्ड्यातून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात अडकून वाहने बंद पडत आहेत. रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशी वाहने घसरून तसेच मोठ्या खड्ड्यातील डबक्यात कोसळून अपघात होत आहेत. खड्ड्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनली आहे. सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटकांची वर्दळ या रस्त्यावर असते. अशा वेळी प्रचंड वाहतूककोंडी होत आहे.
खडकवासला बाह्यवळण रस्त्यावरील खड्डे बुजविले असले तरी पावसामुळे पुन्हा चिखल, पाणी साठत आहे, असे मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मते यांनी सांगितले.
खडकवासला ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौरभ मते यांनी खडकवासला, कोल्हेवाडी ते किरकटवाडी येथील रस्त्याची पावसामुळे झालेली चाळण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सहायक अभियंता नकुल रणसिंग आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांना सोमवारी प्रत्यक्ष बोलवून दाखवून दिली. नांदेड फाट्यापासून सिंहगड रस्त्यावरील खड्डे पाच दिवसांत बुजवून वाहतुकीयोग्य केले नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंच सौरभ मते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी उपसरपंच आदित्य मते, किरकटवाडीचे माजी सरपंच किरण हगवणे, अजय मते, नरेंद्र हगवणे, किरण कोल्हे, स्वप्निल मते आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सौरभ मते यांनी येथील रस्त्यावर साठलेल्या डबक्याबाबत आमदारांना निवेदन देताना प्रसिद्ध केलेली छायाचित्रे चर्चेचा विषय झाली आहेत.

प्रत्यक्ष पाहणी
आमच्या प्रतिनिधीने सिंहगड रस्त्याची नांदेडपासून डोणजे फाट्यापर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली. नांदेड सीटीच्या गेटपर्यंत रस्ता सहापदरी आणि सिमेंट काँक्रीटचा आहे. तेथून पुढे रस्त्याच्या आणि प्रवाशांच्या दुर्दशेला सुरुवात होते. तेथून पुढे रस्ता अरुंद आहे.
नांदेड फाट्यावर अरुंद रस्त्यामुळे नेहमीच वाहतूककोंडी आहे. सुट्टीच्या दिवसांत येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पुढे कॅनॉलवर पुलाचे काम चालू असल्याने जुन्या अरुंद पुलावर खड्डे पडून रस्ता उखडलेला आहे. पूल संपताच वळण रस्ता आहे. वळणावरील उखडलेला रस्ता आणि पडलेल्या खड्ड्यातून रस्ता काढणे येथून वाहनचालकांची खरी कसोटी सुरू होते.
या वळणावरील उखडलेला रस्ता आणि पडलेले खड्डे गेल्या दोन वर्षांपासून तसेच आहेत, असे प्रवाशांनी सांगितले. तेथून पुणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द ठरते. त्यामुळे हा खड्डा कोणी दुरुस्त करायचा? पुढे जल आयोग येथे रस्ता दिसत नाही.

Web Title: The roads in Kirkwadi, Kolhevadi have gone into the pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.