रस्ते, तलावातील गाळ काढण्याची कामे तातडीने करावी : सुप्रिया सुळे यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 07:55 PM2020-02-14T19:55:38+5:302020-02-14T20:06:33+5:30

गेल्या दोन महिन्यात सुळेंची दुसऱ्यांदा पीएमआरडीएला भेट

Roads, lake work should be urgently complete : Supriya Sule demands | रस्ते, तलावातील गाळ काढण्याची कामे तातडीने करावी : सुप्रिया सुळे यांची मागणी 

रस्ते, तलावातील गाळ काढण्याची कामे तातडीने करावी : सुप्रिया सुळे यांची मागणी 

Next
ठळक मुद्देपीएमआरडीए आयुक्त विक्रम कुमार यांची शुक्रवारी भेट; अधिकाऱ्यांशी केली चर्चाभोर-वेल्ह्यातील विद्युतीकरणाची कामे मार्गी लावा सूस ते नांदे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी

पुणे : दौंड, वेल्हा, मुळशी तालुका आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित रस्त्यांची कामे, घरकुल योजना, तलावातील गाळ काढणे अशी विविध कामे तातडीने मार्गी लावावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त विक्रम कुमार यांची शुक्रवारी भेट घेतली. 
महाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर खासदार सुळे सातत्याने विविध विभागातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन मतदारसंघातील कामे मार्गी लावण्याची विनंती करीत आहेत. गेल्या दोन महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा पीएमआरडीएला भेट दिली. सिंचन विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी देखील ते संवाद साधत आहेत. पीएमआरडीए मार्फत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेसाठी अनेक नागरिकांनी अर्ज केले आहेत. अधिकाधिक नागरिकांना या योजनेत सहभागी करुन घेण्याची त्यांनी विनंती केली. दौंड तालुक्यातील. वरवंड येथे अंडर पास करावा, सहजपूर व खुटबाव येथे रेल्वे लाईनवर उड्डाणपूल उभारणी, व्हिक्टोरिया तलावातील गाळ काढणे, वरवंडमधील दिवेकर वस्ती, शेरीचा मळा, भांडगाव-केडगाव शिव रस्ता अशा विविध रस्त्यांची कामे करण्याची मागणीही त्यांनी केली. 
खडकवासला विधानसभा मतदार संघातील खेड शिवापूर ते कुसगाव खिंड मार्गे नवीन रस्ता तयार करणे,रहाटवडे ते रांझे, अभिनव महाविद्यालय ते वाल्हेकरवाडी, नऱ्हे मानाजीनगर, कोंढवे-कोपरे गावासाठी जोडणारे साकव करणे, धायरी ते कात्रज रस्ता आणि ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची कामे मार्गी लावण्याची सूचनाही खासदार सुळे यांनी केली. 
मुळशी तालुक्यातील भूकुम आणि भूगावातील वसती भागात टेमघर धरणातील योजनांमधून पाणी पुरवठा करावा. भूगाव येथे पाझर तलाव ते रामनदी भुयारी गटर योजना आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली. सूस ते नांदे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. 
वेल्हा तालुक्यातील कोंढवली फाट्यापासून कोंढवली पर्यंत (२.५ कि.मी.) रस्ता करावा, ग्रामपंचायत होळकरवाडी येथे गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ५ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी सुळे यांनी केली. 
-----------------

भोर-वेल्ह्यातील विद्युतीकरणाची कामे मार्गी लावा 
भाटघर धरण पाणलोटक्षेत्रात १३२/११ केव्ही उपकेंद्र आहे. पावसाळ्यात हे उपकेंद्र पाण्यात बुडाले होते. त्यामुळे भोर तालुक्यातील १६० गावे ७ दिवस अंधारात होती. त्यामुळे हे केंद्र भाटघर धरणाशेजारील जलसंपदा विभागाच्या जागेत नव्याने बांधण्यात यावे. वेल्हे तालुक्यातील मौजे टेकपोळे येथील खानू, हिरडी, दांडवस्ती, पुरताड वस्ती, आंबेदांडवस्ती येथे विद्युत सुविधा उपलब्ध करुन द्यावी, मुळशी तालुक्यातील कोंढूर, केळांबे, कोकरे विद्युतीकरण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. 

Web Title: Roads, lake work should be urgently complete : Supriya Sule demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.