कामावरून घरी निघालेल्या परप्रांतीय कामगाराला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:06+5:302021-06-28T04:08:06+5:30
याप्रकरणी शहर पोलिसांनी कोच्या ऊर्फ रोहित दीपक कुदळे (रा. विठ्ठलवाडी, गुणवडी, ता. बारामती) व सचिन साहेबराव साळुंके (रा. पिंपळी) ...
याप्रकरणी शहर पोलिसांनी कोच्या ऊर्फ रोहित दीपक कुदळे (रा. विठ्ठलवाडी, गुणवडी, ता. बारामती) व सचिन साहेबराव साळुंके (रा. पिंपळी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस ठाण्यात अमेरिका हंसदेव राजभर या परप्रांतीयाने याबाबत फिर्याद दिली. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून गेल्या आठ दिवसांपूर्वीच बारामतीत आला होता. येथील मॅकडोनाल्ड कंपनीत तो ऑपरेटरचे काम करत होता. शुक्रवारी (दि.२५) जून रोजी सायंकाळी सहा वाजता त्याची सुट्टी झाल्यानंतर तो चालत घरी निघाला. पिंपळी ग्रेप चौकातून तो जळोचीकडे निघाला असताना एक मोटार थांबलेली त्याला दिसली. दुर्लक्ष करत तो पुढे गेला. जनावरांच्या बाजाराजवळ या मोटारीने त्याचा पाठलाग केला. दोघांनी खाली उतरत मोबाईल व खिशातील रक्कम काढून घेतली. मोटारचा क्रमांक (एमएच-११, वाय ६३९१) असल्याचे फिर्यादीने पाहिले. घरी जात पुतण्याला माहिती दिली. त्यानंतर फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस ठाण्यात ते तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना तेथे अगोदरच बसलेल्या साळुंके याला फिर्यादीने ओळखले. त्यानुसार कुदळे व साळुंके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.