तोतया पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 11:57 PM2018-08-28T23:57:45+5:302018-08-28T23:58:13+5:30

तोतया पोलीस अधिकारी बनून आलेल्या जोडगोळीने भिगवण येथील सराफी व्यावसायिकाला हातचलाखी करीत २७ हजार रुपये किमतीच्या सोन्यावर डल्ला मारला.

The robbed police robbed the valued businessman | तोतया पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला लुटले

तोतया पोलिसांनी सराफ व्यावसायिकाला लुटले

googlenewsNext

भिगवण : तोतया पोलीस अधिकारी बनून आलेल्या जोडगोळीने भिगवण येथील सराफी व्यावसायिकाला हातचलाखी करीत २७ हजार रुपये किमतीच्या सोन्यावर डल्ला मारला. ही घटना सोमवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास घडली. घटना घडून एक दिवस उजाडत असताना याच जोडगोळीने नीरा येथील सराफाला गंडा घालण्याचा प्रयत्न केला.

सराफी दुकानात पोलीस अधिकारी असल्याचा अविर्भाव करीत एक जण मोठ्या ऐटीत प्रवेश करतो. काही क्षणात त्याच्या पाठीमागून त्याचा साथीदार येत ज्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कनिष्ठ कर्मचारी शॅल्युट करतात त्याप्रमाणे शॅल्युट करीत सावधानमध्ये पाठीमागे उभा राहतो. अधिकारी सराफी व्यावसायिकाला बोलबच्चन करीत सोन्याच्या वस्तू दाखविण्यास सांगत हात चलाखी करीत सोन्याच्या वस्तूवर डल्ला मारतो. सोमवारी परत पद्मावती ज्वेलर्स येथे सराफाला फसवून ९ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या चोरून पोबारा केला. या जोडगोळीने चोरीसाठी युनिकॉर्न गाडीचा वापर केला.

सोमवारी ही घटना घडली असताना दुसºयाच दिवशी या जोडगोळीने नीरा येथील सराफी दुकानात हात सफाई दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी सराफाच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांचा डाव यशस्वी ठरू शकला नाही. नीरा येथे या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्नदेखील झाला, परंतु झटापटी करीत चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. या बाबत सराफी व्यावसायिकांनी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिली नसल्याचे समजते.
 

Web Title: The robbed police robbed the valued businessman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.