पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेला लुटले; कर्वे रस्त्यावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 08:14 PM2021-03-24T20:14:30+5:302021-03-24T20:15:07+5:30
एका ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हात चलाखीने केले लंपास
पुुणे : पोलीस असल्याची बतावणी करुन तिघा चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेचे ६० हजार रुपयांचे मंगळसुत्र हातचलाखीने चोरुन पळ काढला.
या प्रकरणी कोथरुडमधील गांधी भवन फाटा येथे राहणार्या ६५ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना कर्वे रोडवरील वनदेवी मंदिराच्या शेजारी मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली.
फिर्यादी या वनदेवी मंदिराच्या शेजारुन पायी जात होत्या. यावेळी तिघांनी त्यांना थांबविले. आगे पोलीस चेकिंग चालू है, असे सांगून त्यांना सोने घालून फिरायची बंदी आहे. आम्ही पोलीसवाले आहोत. ते सोने काढून ठेवा, असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसुत्र काढले. चोरट्यांनी ते आपल्या हातात घेऊन फिर्यादींच्या हातातील पिशवीत ते ठेवल्यासारखे करुन हातचलाखी करुन काढून घेतले. काही अंतर गेल्यानंतर त्यांना संशय आल्यावर त्यांनी पिशवी उघडून पाहिल्यावर त्यात मंगळसुत्र नव्हते. पोलीस उपनिरीखक साखरे अधिक तपास करीत आहेत.\