तरुणाला मारहाण करून लुटले
By admin | Published: December 26, 2016 03:55 AM2016-12-26T03:55:57+5:302016-12-26T03:55:57+5:30
कामावरून घरी जात असलेल्या तरुणाला अडवून मारहाण करीत मोबाईल आणि ९00 रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी
पुणे : कामावरून घरी जात असलेल्या तरुणाला अडवून मारहाण करीत मोबाईल आणि ९00 रुपयांची रोकड चोरून नेल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास ओंकारेश्वर मंदिराजवळ घडली होती.
समीर श्रीराम सय्यद (वय २0, रा. कोपरी रोड, उत्तमनगर) याला अटक करण्यात आली असून, त्याचा साथीदार नीलेश शिंदे (वय २0) हा फरार झाला आहे. याप्रकरणी अभिजित गजधनी (वय २१, रा. दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. गजधनी शनिवारी रात्री सायकलवरून घराकडे जात होते. मोटारसायकलवरुन आलेल्या आरोपींनी त्यांना ओंकारेश्वर मंदिराजवळ अडवले. त्यांच्याशी झटापट करीत मोबाईल आणि पाकिटातील ९00 रुपये काढून घेतले. या प्रकाराला विरोध करताच हाताने मारहाण करुन जखमी करुन चोरटे पसार झाले होते. याबाबत गजधनी यांनी पोलिसांना माहिती कळवताच मिळालेल्या वर्णनावरुन चोरट्यांना पकडण्यात यश आले. (प्रतिनिधी)