Pune Crime | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; पिस्तूल, तलवार, कोयता आणि मिरची पूड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 03:43 PM2023-02-22T15:43:50+5:302023-02-22T15:46:09+5:30

आरोपीविरोधात गुन्हे दाखल....

Robbery gang jailed shikrapur police Pistol, Sword, Koyta and Chilli Powder seized | Pune Crime | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; पिस्तूल, तलवार, कोयता आणि मिरची पूड जप्त

Pune Crime | दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; पिस्तूल, तलवार, कोयता आणि मिरची पूड जप्त

googlenewsNext

शिक्रापूर (पुणे) : रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा युवकांना शिक्रापूरपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार, कोयता, चाकू, मिरची पूड जप्त करत विकी उर्फ विवेक उर्फ दाद्या राजेश खराडे, आदित्य नितीन भोईनल्लू, आदिन जैनोद्दीन शेख यांच्यासह दोघा युवकांवर गुन्हे दाखल केले आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पथक २१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त घालत असताना तळेगाव न्हावरा रोड येथे काही युवक संशयितपणे दबा धरुन बसल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवलदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, जयदीप देवकर, निखिल रावडे, लखन शिरसकर, किशोर शिवणकर यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तळेगाव न्हावरा रोड तेथील राहुल करपे यांच्या प्लॉटिंगमध्ये पाच युवक बसल्याचे पोलिसांना दिसले.

पोलीस आल्याची चाहूल लागतात सर्व युवक पळून जाऊ लागले, दरम्यान पोलिसांनी पाठलाग करत तिघा युवकांना जागेवर पकडत त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळ एक पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, तलवार, कोयता, बॅटरी, मिरची पूड, दोरी असे साहित्य मिळून आले.

पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करत पळून गेलेल्या युवकांची  त्यांच्याकडे चौकशी केली असता आम्हाला खर्चासाठी व फिरण्यासाठी पैशाची आवश्यकता असलेल्या आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांची हत्याराच्या धाकाने लुटमार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

याबाबत पोलीस शिपाई निखिल भिमाजी रावडे (रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विकी उर्फ विवेक उर्फ दाद्या राजेश खराडे १९ वर्षे, आदित्य नितीन भोईनल्लू वय २० वर्षे, आदीन जैनोद्दीन शेख वय १९ वर्षे तिघे रा. शिरूर ता. शिरूर जि. पुणे तसेच दोन अनोळखी युवक ( नाव पत्ता माहीत नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन आतकरे व पोलीस नाईक रोहिदास पारखे हे करत आहे. 

Web Title: Robbery gang jailed shikrapur police Pistol, Sword, Koyta and Chilli Powder seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.