शहरात खासगी टॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट

By admin | Published: May 1, 2016 02:56 AM2016-05-01T02:56:37+5:302016-05-01T02:56:37+5:30

खासगी ट्रॅव्हल्स गाडीमालकांकडून शहरातील प्रवाशांची सर्रास लूट सुरू आहे. मागील काही दिवसांपासूनची घसरण भरून काढण्यासाठी तिकिटात दरवाढ करण्यात आली आहे.

Robbery looted passengers from private towels in the city | शहरात खासगी टॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट

शहरात खासगी टॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट

Next

पिंपरी : खासगी ट्रॅव्हल्स गाडीमालकांकडून शहरातील प्रवाशांची सर्रास लूट सुरू आहे. मागील काही दिवसांपासूनची घसरण भरून काढण्यासाठी तिकिटात दरवाढ करण्यात आली आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, इंदूर या भागात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. ३० जणांची क्षमता असणाऱ्या स्लीपर कोच गाड्यांमध्ये वाढ होत आहे.
एसटी व रेल्वेचे आरक्षण फुल झाल्याने ऐन वेळी खासगी ट्रॅव्हल्सने जावे लागते. ज्या मार्गावर जाण्यासाठी जास्त गर्दी असते, त्या मार्गावरील गाड्यांचे दर दुपटीने वाढविले जातात. गावाकडे जाण्यासाठी मिळेल ते वाहन पकडण्याची मानसिकता प्रवाशांची असते. याचाच फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्सवाले येणारे प्रवासी आपल्याकडे वळवतात. ट्रॅव्हल्ससाठी कोणत्याही प्रकारचे भाड्याचे बंधन नाही. त्यामुळे जितके जास्त पैसे घेता येतील तितके ते प्रवाशांकडून घेतात. ट्रॅव्हल्सच्या सुटण्याच्या वेळाही निश्चित नसतात. ते अनेकदा नागरिकांना तासन् तास थांबवून ठेवतात. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. वाकड, काळेवाडी, रहाटणी, कासारवाडी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी, निगडी अशा शहरातील विविध भागातून ट्रॅव्हल्सच्या गाड्या जातात.
आरटीओमध्ये गाडी पासिंगसाठी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागते. हंगामात गाड्या पळवून उत्पन्न वाढविण्यासाठी भाडेतत्त्वावर गाड्या देणाऱ्या गाडीमालकांनी चारचाकी गाड्यांचे विमा व पासिंग मार्चअखेरीच्या पहिलेच केले आहे. नॉन एसीसाठी ११, तर एसीसाठी १२ ते १४ रुपयांपर्यंत प्रतिकिलोमीटर दर आकारण्यात येत आहे. एकाच कुटुंबातील ८-१० लोक बाहेर फिरायला जाण्यासाठी चारचाकी गाड्यांचे बुकिंग करून ठेवत आहेत.
(प्रतिनिधी)

वल्लभनगर आगाराकडूनही जादा बस
उन्हाळ्याच्या सुटीत वल्लभनगर आगाराकडून दर वर्षी जादा बसचे नियोजन करण्यात येते. उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून विविध मार्गांवर जादा गाड्या सोडल्या जातात. प्रवाशांच्या मागणीनुसार मार्गात बदलही केले जातात. आरक्षण सुविधाही काही दिवस अगोदरच सुरू केली जाते. आरक्षण फुल झाल्यामुळे नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. याचाच फायदा खासगी ट्रॅव्हल्सवाले उचलतात. मनमानी पद्धतीने तिकिटांचे दर आकारतात.

ट्रॅव्हल्समुळे वाहतूककोंडी
चिंचवड स्टेशनकडून चिंचवडगावात जाणाऱ्या रस्त्यावर अहिंसा चौकात, काळेवाडी, निगडी, पीएमटी चौक, भोसरी या ठिकाणी सर्वच कंपन्यांचे बुकिंग घेणारे ट्रॅव्हल्सचे कार्यालय आहेत. ते प्रवाशांना त्याच ठिकाणी बोलवतात व तेथूनच गाडी पकडण्यास सांगतात. राज्यातील विविध भागात जाण्यासाठी लोक या ठिकाणी येऊन उभे राहतात. ट्रॅव्हल्सच्या गाड्यांमुळे रस्त्यावर वाहतूककोंडी निर्माण होते.

आरक्षण
केंद्रावर रांग
शहरात खडकी, चिंचवड व तळेगाव अशा तीन ठिकाणी रेल्वे आरक्षण केंद्र आहे. तत्काल तिकिटासाठी तेथे लांबच्या लांब रांगा लागत आहेत. एजंटांची दादागिरी असल्याने नागरिकांना तिकीट काढता येत नाहीत.

Web Title: Robbery looted passengers from private towels in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.