पुण्यातील बड्या हॉस्पिटलांकडून रुग्णांची लूट; जास्तीच्या बिलाची रक्कम १५ कोटींच्या घरात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 11:59 AM2021-07-20T11:59:10+5:302021-07-20T11:59:18+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ४९१ बिलांची तपासणी करून जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांची तब्बल १५ कोटी ६३ लाख ७९ हजार रुपयांची बचत केली आहे
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ४९१ बिलांची तपासणी करून जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांची तब्बल १५ कोटी ६३ लाख ७९ हजार रुपयांची बचत केली आहे. शहरातल्या बहुतेक सर्व बड्या हॉस्पिटलांनी रुग्णांना जास्तीचे बिल लावल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
कोरोना रुग्णांची खासगी हाॅस्पिटलकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी शासनाने खासगी रुग्णालयांना नियमानुसार बिले आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतरही खासगी हाॅस्पिटलची मनमानी सुरूच असल्याने जिल्हा प्रशासनाने शंभर कोविड हाॅस्पिटलची बिले तपासणीसाठी लेखा परीक्षकांची टीमच नियुक्त केली आहे.
कोरोना रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्याच्या गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी खासगी हॉस्पिटलांनी दिलेल्या दीड लाख रुपयांवरील रकमेच्या बिलांचे पूर्वतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांबरोबरच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांकडून अवाजवी बिले आकारण्याच्या गैरप्रकाराला आळा बसण्यासाठी खासगी हॉस्पिटलांनी दिलेल्या दीड लाख रुपयांवर रकमेच्या बिलांचे पूर्वतपासणी करण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला. त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागासाठी लेखा परीक्षकांची सर्वत्र समिती स्थापन करण्यात आली. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी बिलांची नियमित तपासणी सुरू आहे.
शहरातल्या या बड्या हाॅस्पिटलांकडून जास्त बिल आकारणी
जिल्हा प्रशासनाने केलेल्या कोरोना बिलांच्या लेखा परीक्षणामध्ये पुणे शहरातील सह्याद्री हॉस्पिटल (डेक्कन), जहॉंगिर हॉस्पिटल, पूना हॉस्पिटल, राव नर्सिंग होम, भारती हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांचा समावेश आहे. या हाॅस्पिटलांनी शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक बिल आकारले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यंत्रणेने समोर आणले आहे.
अशी झाली कोरोना बिलांची तपासणी
क्षेत्र बिलांची संख्या कमी झालेली रक्कम
पुणे १७,२४ ५ कोटी २० लाख ९९ हजार
पिंपरी-चिंचवड ५३,४५ ६ कोटी ९५ लाख ३७ हजार
पुणे ग्रामीण ११,४२२ ३ कोटी ४७ लाख ७९ हजार
एकूण १८,४९१ १५ कोटी ६३ लाख ९९ हजार