‘लॉकडाऊन’मुळे ‘रोजी’ गेली;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:28+5:302021-04-21T04:10:28+5:30
जिह्यात सुमारे ११ हजार २८३ जणांना मिळतोय लाभ पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले ...
जिह्यात सुमारे ११ हजार २८३ जणांना मिळतोय लाभ
पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगार वर्गांचे हाल होत आहेत. मात्र, सरकारने २ लाख शिवभोजन थाळी मोफत देण्याची व्यवस्था केल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. जेवणाचा मुख्य प्रश्न भागल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
कडक निर्बंधामुळे हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये, म्हणून एक महिनाभर रोज जवळपास २ लाख थाळ्या मोफत दिले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानुसार कामगारांना थाळीचा लाभ मिळत आहे.
बुधवारी १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेपासून ते १ मेपर्यंत राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांच्या रोजीरोटीची प्रश्न निर्माण झाली असती. कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन केल्याने अनेकांची रोजी बंद पडली आहे. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला.
------------------------
जिह्यात शिवभोजन थाळी केंद्र-
एकूण ९७ (शहरात २६, ग्रामीण भागात ७१)
दररोज घेतात लाभ -
एकूण ११, २८३ (शहरात ४,१२९, ग्रामीण भागात ७,१५४)
.........
थाळीचा लाभ घेणारे
मागच्या लॉकडाऊनपासून शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहे. थाळीमुळे जेवणाची चिंता मिटली आहे. काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सरकारने राबविलेली योजना चांगली आहे.
- दुर्गाराम भाटी
-----------------------
शहरात शिकण्यासाठी आलो आहे. लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद आहे. मूळ गावी न जाता डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आहे. पोटभर शिवभोजन थाळीमुळे चांगले जेवण मिळते. सध्या काम सुरू असले तरी तेवढ्या प्रमाणात रोजगार मिळत नाही.
-नीलकंठ वाघ
-----------------
काम नसल्यामुळे आर्थिक अडचण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे काम मिळणे कठीण होऊन बसले आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये खूप त्रास सहन करावा लागला होता. आताही परिस्थिती तशीच होऊ लागली आहे. शिवभोजन थाळी मोफत मिळत असल्याने आधार मिळाला आहे.
-कोमल पट्टीवार
...........
११३ जणांना मिळतो
दररोज लाभ....
१) प्रत्येक केंद्राला थाळीची मर्यादा दिलेली आहे. आमच्या केंद्राला ७५ थाळीची मर्यादा होती. सद्य परिस्थितीत ११३ थाळींची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे.
२) काही केंद्रांना २१३ ते २३५ पर्यंत थाळ्यांची मर्यादा देण्यात आली आहे. शिवभोजन थाळीमुळे अनेकांचा जेवणाचा गंभीर प्रश्न सुटला आहे. दिवसेंदिवस थाळीला वाढता प्रतिसाद मिळत आहे. असे थाळी केंद्रचालक रोहित पाठारे यांनी सांगितले.
-----------------