वेळू-भोंगवली गटात काँग्रेसला घवघवीत यशाचा दावा : रोहन बाठे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:48+5:302021-02-15T04:10:48+5:30

जिल्ह्यासह भोर तालुक्यात नुकत्याच सरपंच ,उपसरपंच पदाच्या निवडी झाल्या आहेत. २४ ग्रामपंचायतीवर काँग्रेस व त्यांच्या समविचारी पक्षांमुळे सत्ता ...

Rohan Bathe claims victory in Velu-Bhongwali group | वेळू-भोंगवली गटात काँग्रेसला घवघवीत यशाचा दावा : रोहन बाठे.

वेळू-भोंगवली गटात काँग्रेसला घवघवीत यशाचा दावा : रोहन बाठे.

Next

जिल्ह्यासह भोर तालुक्यात नुकत्याच सरपंच ,उपसरपंच पदाच्या निवडी झाल्या आहेत. २४ ग्रामपंचायतीवर काँग्रेस व त्यांच्या समविचारी पक्षांमुळे सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, मुंबई मार्केट कमिटीचे उपसभापती धनंजय वाडकर, दिलीप बाठे,काँग्रेसचे उपाध्यक्ष माऊली पांगारे, भगवान भांडे, युवक कार्याध्यक्ष महेश टापरे, राजगड कारखान्याचे संचालक के. डी.सोनवणे, पोपटराव सुके, दत्तात्रय भिलारे, दिलीप कोंडे, मारुती गुजर, आप्पा धाडवे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चिकाटी व मेहनतीने काँग्रेसने यश मिळविले असल्याचे बाठे यांनी सांगितले.

काँग्रेसने सरपंच व उपसरपंचपदी दावा केलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे : शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू, रांझे, खोपी, शिवरे, वर्वे खुर्द, देगाव, नायगाव, दिवळे, कापूरहोळ, निगडे, धांगवडी, किकवी, मोरवाडी, सारोळा, सावरदरे, पांडे, रांझे, राजापूर भोगवली, न्हावी २२, पेंजळवाडी, टापरेवाडी, कासुर्डी खे.बा.

तर, महामार्गावरील कुसगावं,साळवडे, केळवडे,वर्वे बु, कांजळे, केंजळ, गुनंद, कामथडी, उंबरे व न्हावी १५ आदी गावातून थोड्या सदस्य निवडीवर समाधान मानावे लागले असले तरी अनेक गावांमधून पक्ष विरहीत स्थानिक गाव पॅनल असल्याचे अनेक गावांतून चित्र पाहायला मिळाले.

वेळू- भोंगवली गटात झालेल्या ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्यासोबत आनंद व्यक्त केला.

Web Title: Rohan Bathe claims victory in Velu-Bhongwali group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.