रोहिडेश्वर किल्ल्यावरील पायवाट पुन्हा खुली; विविध संघटना, शिवप्रेमींनी दगडमाती केली बाजूला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 05:26 PM2023-08-14T17:26:04+5:302023-08-14T17:26:53+5:30

पुरातत्व विभागाने त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती करावी...

Rohideshwar Fort Trail Reopened; Various organizations, Shiv lovers stoned aside | रोहिडेश्वर किल्ल्यावरील पायवाट पुन्हा खुली; विविध संघटना, शिवप्रेमींनी दगडमाती केली बाजूला

रोहिडेश्वर किल्ल्यावरील पायवाट पुन्हा खुली; विविध संघटना, शिवप्रेमींनी दगडमाती केली बाजूला

googlenewsNext

भोर (पुणे) : वीसगाव खोऱ्यातील रोहिडेश्वर (विचित्रगड) किल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वाराजवळील ढासळलेल्या तटबंदीचा राडारोडा व दगडमाती बाजूला करून गडावर जाणारी वाट विविध संघटना व शिवप्रेमींनी दिवसभर काम करून खुली केली. यामुळे पर्यटकांना आता किल्ल्यावर जाता येणार असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रोहिडेश्वर किल्यावरील तटबंदी पावसामुळे ढासळली होती त्यामुळे गडावर जाणारी पाऊलवाट बंद झाली होती. पुरातत्व विभागाकडून परवानगी घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान, स्वराज्यभूमी प्रतिष्ठान भोर शिवप्रतिष्ठान भोर, गडकिल्ले संर्वधन प्रतिष्ठान भोर, वेल्हे, बाजारवाडी ग्रामस्थ आणि शिवप्रेमींनी दिवसभर काम करून पाऊलवाटेवर पडलेली दगडमाती बाजूला करून गडावर जाणारी वाट मोकळी केली.

किल्ले रोहिड्यावरील गणेश दरवाजाशेजारील बुरूज ऊन, वारा, पावसाशी झगडत अविरत उभा होता. परवा सकाळी बुरूज ढासळला होता. काल सकाळी ७ वाजता मोहिमेस सुरुवात झाली. जमिनीपासून साधारण ६०० ते ७०० फूट उंची, पाऊस, दाट धुके आणि निसरड्या अरुंद वाटा अशा खडतर परिस्थितीमध्ये सर्व शिवप्रेमींनी स्वराज्याप्रती असलेली आस्था दाखवून बुरुजाच्या मोठमोठ्या शिळा अस्ताव्यस्त पडल्या होत्या, पर्यायाने गडावर जाणारा मार्ग बंद झाला होता. मात्र शिवप्रेमींनी प्रयत्नांची शिकस्थ करत अस्ताव्यस्त दगड, चिरे सुरक्षित ठिकाणी हलवले. यामध्ये साधारण ४०० ते ४५० शिवप्रेमी, दुर्गप्रेमींनी व युवतींनी सहभाग घेऊन वाट मोकळी केली. यामुळे गडावर जाणाऱ्या पर्यटकांना व स्थानिक ग्रामस्थांना जाणे सोपे होणार आहे.

दरम्यान रोहिडेश्वर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील तटबंदी ढासळली असून, उर्वरित तटबंदीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे उर्वरित तटबंदी आणि बुरुजाजवळील जुने बांधकाम कधीही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी गडावर जाताना विशेष काळजी घ्यावी असे आवाहन शिवप्रेमी संघटनांकडून करण्यात आले.

पुरातत्व विभागाने त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती करावी

रोहिडा किल्यावरील तटबंदी अतिवृष्टीमुळे ढासळली असून अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्यामुळे पुरातत्व विभागाने गडाची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शिवप्रेमी संघटनांनी केली आहे.

Web Title: Rohideshwar Fort Trail Reopened; Various organizations, Shiv lovers stoned aside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.