रोहिणी नक्षत्रात होणार ‘उन्नत’ शेती समृद्ध

By admin | Published: April 19, 2017 04:09 AM2017-04-19T04:09:26+5:302017-04-19T04:09:26+5:30

या वर्षी संपूर्ण ‘रोहिणी’ नक्षत्रातील १५ दिवस कृषी विभाग ‘उन्नत शेती-समृद्ध श्ंोतकरी पंधरवडा’ साजरा करणार आहे. याचा कालावधी २५ मे ते ८ जूनपर्यंत असणार आहे

Rohini Nakshatra will be 'upgraded' rich in agriculture | रोहिणी नक्षत्रात होणार ‘उन्नत’ शेती समृद्ध

रोहिणी नक्षत्रात होणार ‘उन्नत’ शेती समृद्ध

Next

बारामती : या वर्षी संपूर्ण ‘रोहिणी’ नक्षत्रातील १५ दिवस कृषी विभाग ‘उन्नत शेती-समृद्ध श्ंोतकरी पंधरवडा’ साजरा करणार आहे. याचा कालावधी २५ मे ते ८ जूनपर्यंत असणार आहे. या पंधरवड्यात उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानामधून खरीप हंगाम पूर्वतयारी करण्यात येणार आहे. कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी गावोगावी जाऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहेत. तसेच यामधून शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकेही दाखविली जाणार आहेत, अशी माहिती बारामती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी दिली.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाने शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा आणि घेतलेल्या पीक कर्जापेक्षा अधिक उत्पन्न मिळावे, यासाठी ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियान सुरू केले आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून हे अभियान राज्यभरात राबवण्यात येणार आहे. कृषी विकास व उत्पादनवाढीसाठी तालुका हा विकास घटक ठरवून नियोजन करण्यात आले आहे. शासनाने खरीप हंगामामध्ये लागणारे उत्तम प्रकारचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी पुढील ५ वर्षांचा बियाणे पुरवठ्याचा आराखडा, वेळेत खतांचा मुबलक पुरवठा, दर्जेदार कंपन्यांची कीटकनाशके, शासकीय प्रयोगशाळेतून जैविक द्रवरूप खते व जैविक कीटकनाशकांच्या पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Rohini Nakshatra will be 'upgraded' rich in agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.