नसरापूरच्या सरपंचपदी रोहिणी शेटे तर उपसरपंचपदी गणेश दळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:11 AM2021-02-11T04:11:28+5:302021-02-11T04:11:28+5:30

नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य आहेत. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण महिलासाठी राखीव होते. त्यामुळे नसरापूर गावची महिला सरपंच ...

Rohini Shete as Sarpanch of Nasrapur and Ganesh Dalvi as Deputy Sarpanch | नसरापूरच्या सरपंचपदी रोहिणी शेटे तर उपसरपंचपदी गणेश दळवी

नसरापूरच्या सरपंचपदी रोहिणी शेटे तर उपसरपंचपदी गणेश दळवी

Next

नसरापूर ग्रामपंचायतीमध्ये ११ सदस्य आहेत. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण महिलासाठी राखीव होते. त्यामुळे नसरापूर गावची महिला सरपंच कोण होणार या चर्चेवर आज पडदा पडला. सरपंच पदासाठी रोहिणी शेटे तर उपसरपंच पदासाठी गणेश दळवी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सरपंच व उपसरपंच यापदासाठी अनुक्रमे शेटे व दळवी या दोघांचेच अर्ज वैध ठरल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

सरपंच व उपसरपंच निवडीसाठी झालेल्या या बैठकीत संदीप शंकर कदम, मुलानी इरफान हबीब, वाल्हेकर सुधीर सोपान, चव्हाण नामदेव आत्माराम, कदम उषा विक्रम, झोरे सपना ज्ञानेश्वर, हाडके श्रद्धा संतोष, कांबळे अश्विनी संदीप, लष्कर मेघा उमेश हे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचितांचा सत्कार येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात पार पडला.

यावेळी यशवंत कदम, माजी सरपंच भरत शेटे, माजी उपसरपंच सुरेश दळवी, शंकर शेटे, ज्ञानेश्वर झोरे, अनिल शेटे, राजेंद्र वाल्हेकर, महेश दळवी, संजय वाल्हेकर, उत्तम निकम, रमेश शेटे, सुधीर शेडगे, ज्ञानोबा वाल्हेकर उपस्थित होते.

१० नसरापूर शेटे

१० नसरापूर दळवी

Web Title: Rohini Shete as Sarpanch of Nasrapur and Ganesh Dalvi as Deputy Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.