सोरतापवाडी येथील गुंजाळमळ्यात रोहित्र फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:54+5:302021-03-13T04:17:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लोणी काळभोर : सोरतापवाडी गावचे हद्दीत गुंजाळ मळा येथील पाणी पुरवठासाठी असणाऱ्या विद्युत रोहित्र फोडून राेहित्रातील ...

Rohitra broke into Gunjalmalya at Soratapwadi | सोरतापवाडी येथील गुंजाळमळ्यात रोहित्र फोडले

सोरतापवाडी येथील गुंजाळमळ्यात रोहित्र फोडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी काळभोर : सोरतापवाडी गावचे हद्दीत गुंजाळ मळा येथील पाणी पुरवठासाठी असणाऱ्या विद्युत रोहित्र फोडून राेहित्रातील १५० लिटर ऑइल व तांब्याची तार असा एकूण ८० हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी कुंजीरवाडी येथील महावितरण शाखा कार्यालयाचे वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश बाळकृष्ण भोंडवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महावितरण कुंजीरवाडी कार्यालयाचे अंतर्गत सोरतापवाडी गुंजाळमळा येथील जमीन गट नंबर ४७६ मध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी विद्युत रोहित्र आहे. रोहित्राची देखभाल भोंंडवे पाहतात.

बुधवारी (दि.१०) सकाळी सातच्या सुमारास त्यांना शेतकरी दशरथ गणपत जवळकर यांनी फोन करून गुंजाळ मळा येथील गौतम पाणी पुरवठा येथील रोहित्र चोरीस गेले आहे. भोंडवे व वायरमन अनिकेत रवींद्र चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रोहित्र खाली पडलेले दिसले. त्यामधील ऑइल सांडलेले होते. त्यातील ऑइल व तांब्याची तार चोरीस गेल्याचे लक्षात आले. म्हणून त्यांनी चोरट्यांविरोधांत १५ हजार रुपये किमतीचे अंदाजे १५० लिटर ऑइल व ६५ हजार रुपयेे किमतीची १८० किलो वजनाची तांब्याची तार अशी एकूण ८० हजार रुपयांची चोरी झाली असल्याची तक्रार दिली.

Web Title: Rohitra broke into Gunjalmalya at Soratapwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.