रोहित्र चोरांचा धुमाकूळ
By admin | Published: September 18, 2014 12:27 AM2014-09-18T00:27:17+5:302014-09-18T00:27:17+5:30
वीज यंत्रणोतील अतिशय महत्त्वाच्या रोहित्रंच्या चोरीचे प्रमाण पुणो जिल्ह्यात वाढत आहे.
Next
पुणो/ पिंपरी सांडस : वीज यंत्रणोतील अतिशय महत्त्वाच्या रोहित्रंच्या चोरीचे प्रमाण पुणो जिल्ह्यात वाढत आहे. गेल्या 15 महिन्यांत पुणो जिल्ह्यात तब्बल 7क्5 रोहित्रंची चोरी झालेली आहे.
लोणीकंद पोलीस ठाण्याअंतर्गत अष्टापूर (ता. हवेली) येथे आज (दि. 17) पहाटे अडीचच्या सुमारास पोलीस, महावितरणचे जनमित्र व नागरिक यांनी तीन जणांच्या टोळीला रोहित्र चोरताना रंगेहाथ पकडले.
सागर तानाजी धनपड (वय 24, रा. वाकड, पुणो), अहमद अब्दुल करीम खान (वय 21, रा. खेड शिवापूर, ता. भोर), सलीम अब्दुल खान (वय 24) अशी तिघांची नावे आहेत.
अष्टापूर गावातील मुळा-मुठा नदीलगत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चोरी करताना तीन चोरटय़ांना ग्रामस्थांनी स्कॉर्पिओ वाहन व चोरीच्या हत्यारासह पकडले. परिसरात गेल्या महिन्यापासून पन्नासहून अधिक रोहित्रंची चोरी झाल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. लोणी कंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अष्टापूरसह परिसरातील गावांत गेल्या महिन्यापासून महावितरणचे रोहित्र चोरीस जाण्या:या घटना वारंवार घडत होत्या. रोहित्र चोरी जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने गस्त घालावी लागत होती. मंगळवार दि.16 रोजी अष्टापूर ग्रामस्थ गस्तीवर असताना मुळा-मुठा नदीलगत रोहित्र चोरीचा प्रकार उघडकीस आला.
ग्रामस्थांनी लोणी कंद व लोणी काळभोर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रोहित्रचोरांना रंगेहाथ पकडले. चोरटय़ांकडून स्कॉर्पिओ वाहन व हत्यारे हस्तगत केली आहेत. (वार्ताहर)
4पुणो जिल्ह्यात गेल्या 15 महिन्यांत 7क्5 रोहित्रे चोरीस गेली आहेत. यात पुणो परिमंडलातील मुळशी विभागात 119, मंचर- 12 आणि राजगुरुनगर विभागात 127, अशी एकूण 258 रोहित्रे; तर बारामती परिमंडलातील बारामती, केडगाव व सासवड विभागांत 447 रोहित्रे चोरीस गेली. गेल्या 15 महिन्यांत महावितरणचे रोहित्रंच्या चोरीमुळे सुमारे 8 ते 1क् कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
4रोहित्र चोरीस गेल्यानंतर ग्राहकांना मिळणारी वीजसेवा प्रभावित होते. वीजग्राहकांचे विजेअभावी नुकसान होते आणि महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान होते. रोहित्रची चोरी रोखण्यासाठी महावितरण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे; परंतु ग्राहकांनीही त्यांच्या परिसरातील रोहित्र चोरीस जाऊ नये, यासाठी सतर्क राहणो आवश्यक आहे.