रोहित्र दुरुस्तीमुळे सासवडचा पाणीपुरवठा होणार नियमित

By admin | Published: March 25, 2017 03:33 AM2017-03-25T03:33:44+5:302017-03-25T03:33:44+5:30

सासवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर पाणीपुरवठा योजनेचा कांबळवाडी येथील रोहित्र जळाल्यामुळे सासवडचा पाणीपुरवठा एक दिवस बंद होता.

Rohtak repairs will continue to provide water to Sasvad | रोहित्र दुरुस्तीमुळे सासवडचा पाणीपुरवठा होणार नियमित

रोहित्र दुरुस्तीमुळे सासवडचा पाणीपुरवठा होणार नियमित

Next

सासवड : सासवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर पाणीपुरवठा योजनेचा कांबळवाडी येथील रोहित्र जळाल्यामुळे
सासवडचा पाणीपुरवठा एक दिवस बंद होता. नगरपरिषदेने तातडीने रोहित्र मिळविण्याची व्यवस्था केल्याने आज (दि.२५) रोजी रोहित्र बसविणार असल्याने सायंकाळपर्यंत वीर धरणातून पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष
मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद जळक, उपनगराध्यक्ष विजय वढणे यांनी दिली.
रोहित्र मागणीसाठी वीज वितरण कंपनीला नगरपरिषदेने विनंती केली होती. नगर पालिकेचे रोहित्र दुरुस्तीसाठी दिले असून ते दुरुस्त होईपर्यंत वीज वितरण कंपनीचे रोहित्र वापरण्यात येणार आहे.सासवड शहरास एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. यासाठी अंदाजे ५० लक्ष लिटर पाणी लागते. सध्या वीर धरण, घोरवडी धरण, गराडे तलाव यातून पाणी घेतले जाते. आता गराडे तलावात पाणी शिल्लक नाही. घोरवडीमधून दररोज दहा लक्ष लिटर पाणी मिळते व वीर धरणातून ४० लक्ष लिटर पाणी घेतले जाते.
वीर योजनेचे पाणी बंद झाले आहे. मात्र घोरवडीमधून पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सासवडकर नागरिकांना आज (शनिवार, दि.२५) रोजी पाणी मिळणार आहे, असे नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले. मात्र नेहमी एक तास पाणी मिळते, त्या ऐवजी अर्धातास पाणी सोडण्यात येईल.
शनिवारी कांबळवाडी येथे रोहित्र बसविल्यानंतर दुपारपर्यंत पाणीपुरवठा नियमित होईल. नागरिकांनी पाणी जपून वापरावे व नगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Rohtak repairs will continue to provide water to Sasvad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.