रोकेम कचरा प्रकल्पास भीषण आग, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 03:45 AM2018-03-08T03:45:05+5:302018-03-08T03:45:05+5:30
रामटेकडी येथील रोकेम कचरा प्रकल्पास भीषण आग लागल्याने धूर व आगीचे लोट निघाले. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या आगीमध्ये सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकल्पाच्या मागील बाजूस साठवलेल्या कचºयामध्ये काम करीत असलेल्या जेसीबीला आग लागल्यावर स्फोट होऊन ही आग जास्तच भडकली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
हडपसर - रामटेकडी येथील रोकेम कचरा प्रकल्पास भीषण आग लागल्याने धूर व आगीचे लोट निघाले. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या आगीमध्ये सुमारे दीड कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रकल्पाच्या मागील बाजूस साठवलेल्या कचºयामध्ये काम करीत असलेल्या जेसीबीला आग लागल्यावर स्फोट होऊन ही आग जास्तच भडकली. त्यामुळे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
रामटेकडी येथे आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास रोकेम कचरा प्रकल्पाच्या मागील बाजूस असलेल्या कचºयामध्ये एक जेसीबीचे काम चालू होते. शॉर्टसर्किटने जेसीबीने पेट घेतला. त्यानंतर जेसीबीच्या चालकाने पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढत जाऊन जेसीबीच्या केबिनला आग लागली. त्यानंतर डिझेल टँकला आग लागून २ स्फोट झाले. स्फोटामध्ये आग विखुरल्याने येथे असलेल्या ४५०० टन कचºयाने पेट घेतला. आग विखुरल्याने प्रकल्पातील काही यंत्रसामग्रीला आग लागली. प्रकल्पातील २ कंटेनर पेटून खाक झाले. ३५० टनावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प आहे.
आगीच्या ज्वाला व धुराचे लोट पसरल्याने वातावरण दूषित झाले, अग्निशामक दलाचे शिवाजी चव्हाण व त्यांचे सहकारी राजू टिळेकर, अमित शिंदे, बाबा चव्हाण, सखाराम पवार, राजाराम केदारी यांनी ४ अग्निशामक गाड्या, २ टँकर, पालिकेचे २ टँकर घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. तातडीने आग विझवल्याने कचरा प्रकल्पाच्या मशीन आगीतून वाचविण्यास अग्निशामक दलास
यश आले; मात्र वाºयामुळे
मोकळ्या जागेतील आग वाढतच
आहे.
धुराचे लोट सुरू असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुरून धुराचे लोट दिसत होते.
औरंगाबाद येथील कचरा प्रश्न २१ दिवस झाले अद्यापही तो सुटला नाही. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की, नवीन कचरा डंपिंग प्रकल्पास इंचभरही जागा मिळणार नाही. आज हडपसर येथील रोकेम प्रकल्पास भीषण आग लागली. नव्याने होऊ घातलेल्या ७५० टन कचरा प्रकल्पास हडपसरकर नागरिकांचा तीव्र विरोध असताना लागेबांधे जपण्यासाठी पुणे महापालिका भाजपा सत्ताधारी कचरा प्रकल्प लादत आहेत. भीषण आग म्हणजे मोठे षड्यंत्र असून याचा जाब नागरिक विचारतील.
- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते