मंचर नगरपंचायत व्हावी अशीच राष्ट्रवादीची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:15 AM2021-08-12T04:15:03+5:302021-08-12T04:15:03+5:30
मंचर शहरात नगरपंचायत व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचा ...
मंचर शहरात नगरपंचायत व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचा एक पदाधिकारी उपस्थित राहून त्याने भाषण केले होते. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला होता. यासंदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट करताना मंचर शहर अध्यक्ष सुहास बाणखेले म्हणाले, की मंचर शहरामध्ये नगरपंचायत व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी मंचर शहर यांच्या वतीने जे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये घेतले. सदर आंदोलनामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारे सहभागी नव्हते. ही पक्षाची ठाम भूमिका आहे. मंचर शहरामध्ये नगर पंचायत व्हावी ही भूमिका महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही आहे. त्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यास शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पाठिंबा आहे. तसेच मंचर शहर नगरपंचायत व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते प्रयत्न करत आहेत.आंदोलन करून सरकारला तसेच प्रशासनाला पक्षाच्या वतीने कुठल्याही प्रकारे वेठीस धरणार नाही, ही पक्षाची भूमिका आहे. आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कुणीही पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होत असतील तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल. त्यात पक्षाची कोणतीही भूमिका नसेल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास बाणखेले यांनी दिले आहे.