रोमिओ रविदास और जुलिएट देवी चा प्रयोग होणारच..! आयोजकांची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 01:46 PM2019-08-16T13:46:56+5:302019-08-16T14:09:32+5:30
रोमिओ रविदास अँड जूलिएट देवी हा नाट्यप्रयोग गुजरात व तामिळनाडू येथील ऑनरकिलिंग घटनांवर आधारित आहे.
पुणे : गुजरात आणि तामिळनाडू येथील ऑनरकिलिंग घटनांवर आधारित रोमिओ रविदास आणि जूलिएट देवी हा नाट्यप्रयोग पुण्यात शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी प्रयोगाच्या आदल्या दिवशीच्या मध्यरात्री या मुंबईच्या या ग्रुपमधील काही कलाकार व त्यांच्या साहित्याची तपासणी केली. त्यामुळे एफटीआयआय इथे होणारा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. मात्र, आयोजकांनी हा प्रयोग रद्द करण्यात आला नसून तो शुक्रवारीच ( दि. १६) सायंकाळी ७ वाजता एरंडवणा येथील एक्सप्रेशन लॅब इथे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिष्ठा साहा दिग्दर्शित '' रोमिओ रविदास अँड जूलिएट देवी '' या नाट्यप्रयोगात गुजरात व तामिळनाडू येथील ऑनरकिलिंग घटनांवर भाष्य करण्यात आले आहे. पुण्यातील सुदर्शन रंगमंच येथे या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता. आणि त्याचा दुसरा प्रयोग एफटीआयआय येथे शुक्रवारी आयोजित करण्यात होता. मात्र, पोलिसांनी १४ ऑगस्टला प्रयोगातील कलाकारांच्या हॉटेलवर जाऊन कुठलीही पूर्वसूचना न देता तपासणी केली. प्रयोग सादर करणारा ग्रुप मुंबईचा आहे. त्यांच्यात यश खान नावाचा कलाकार आहे. त्याची झडती घेत पोलिसांनी इतर सहकाऱ्यांचे सर्वांचे साहित्य तपासले. कलाकारांसोबत घडलेल्या प्रकारानंतर आयोजकांनी एफटीआयआय मधील प्रयोग रद्द केला.
शर्मिष्ठा साहा '' रोमिओ रविदास अँड जूलिएट देवी '' या नाट्यप्रयोगाच्या दिग्दर्शक असून त्या आयआयटी मुंबईमध्ये असि.प्रोफेसर आहे. कलाकारांसोबत घडलेल्या प्रकारानंतर आयोजकांनी एफटीआयआयमधील प्रयोग रद्द केला. मात्र, आता तो आजच एक्सप्रेस लॅबमध्ये होणार आहे. पोलिसांनी कलाकारांसह कुणालाही प्रयोगाबद्दल काहीही सांगितलेले नाही.