रोटरीतर्फे गरीब विद्यार्थ्यांना मोबाइलचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:10 AM2021-03-07T04:10:09+5:302021-03-07T04:10:09+5:30
राज्यात कोरोनोमुळे शाळा बंद असून मुलांना मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण दिले जाते. मात्र, अनेक गरीब विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल खरेदी ...
राज्यात कोरोनोमुळे शाळा बंद असून मुलांना मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण दिले जाते. मात्र, अनेक गरीब विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल खरेदी करू शकत नाही, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष जयश्री भोसले यांनी प्रयत्न करीत आपली मागणी रोटरी क्लबकडे केली. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ पुणे येथील व शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर अध्यक्ष अनिल बोरा, सदस्य प्रकाश बोरा यांचं कडून धापटे सर यांच्या माध्यमातून मलठण जिल्हा परिषद शाळेतील गरजू, हुशार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये किंमतीचे १० मोबाईल विद्यार्थ्यांना दिले. त्याचबरोबर रक्तदाब तपासणारे यंत्र, तापमापक, मास्क, पुस्तके आदी साहित्य ही शाळेला देण्यात आले. या वेळी मलठणच्या सरपंच शशिकला फुलसुंदर, उपसरपंच विनोद कदम उपस्थित होते. तसेच सदस्य दादा गावडे, किरण शिंदे, पोपट साळवे, रामदास गायकवाड, संपत गायकवाड, उपाध्यक्ष जयश्री भोसले, सुदाम गायकवाड, सुरेश गायकवाड, मुंकुद नरवडे, एकनाथ बाजारे, पाटीलबा मिडगुले उपस्थित होते.
फोटो : मलठण जिल्हा परिषद शाळेत रोटरी क्लब च्या वतीने शाळेतील गरीब विद्यार्थ्याना मोफत मोबाईल वाटप करताना सरपंच शशिकला फुलसुंदर व मान्यवर.