तमाशा कलावंतांना रोटीरीने केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:08 AM2021-06-25T04:08:40+5:302021-06-25T04:08:40+5:30
रोटरी क्लब नारायणगाव यांनी रोटरी क्लब बिबवेवाडी, रोटरी क्लब निगडी, एस. जी. ऍनालिटिक्स कंपनी आणि इनरव्हील क्लब नारायणगाव यांच्या ...
रोटरी क्लब नारायणगाव यांनी रोटरी क्लब बिबवेवाडी, रोटरी क्लब निगडी, एस. जी. ऍनालिटिक्स कंपनी आणि इनरव्हील क्लब नारायणगाव यांच्या सहकार्याने नारायणगाव परिसरातील २०० कुटुंबांना एक महिना पुरेल इतका किराणा वाटप केला. कोरोनामुळे कलावंतांची गंभीर परिस्थिती नारायणगाव क्लबने जाणली आणि त्यांनी पुढाकार घेऊन याही परिस्थितीत हा स्तुत्य उपक्रम केला.
याप्रसंगी अध्यक्ष आर्किटेक्ट सचिन घोडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी अमित बेनके, आकाश बोरकर, अरविंद ब्रह्मे, ग्रा. पं. सदस्य वारूळवाडी जंगल कोल्हे, स्न्हेल कांकरिया, अतुल कांकरिया, काळे, सुजाता भुजबळ, निगडी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन मेहेर, योगेश भिडे, राजेंद्र बोरा, माऊली लोखंडे, प्रिया कामत, प्रिया घोडेकर, रेखा ब्रह्मे यांनी केले.
२४ नारायणगाव रोटरी
दोनशे गरजू कुटुंबांना एक महिन्याचा किराणा वाटप करताना रोटरीचे पदाधिकारी.