आसदे येथे रोटरीतर्फे विद्यार्थ्यांना परसबागेचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:10 AM2021-02-10T04:10:27+5:302021-02-10T04:10:27+5:30
यावेळी रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राहुल वाळुंज, रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडाचे अध्यक्ष विद्याधर जोशी, पर्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष ...
यावेळी रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगरचे अध्यक्ष राहुल वाळुंज, रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडाचे अध्यक्ष विद्याधर जोशी, पर्याय प्रतिष्ठानचे अध्यक्ष वामन बाजारे, प्रकल्प प्रमुख अविनाश कोहिनकर, राजेश बोकील, सेक्रेटरी चक्रधर खळदकर, समीर शास्त्री, प्रदीप पाटील, प्रशांत पाटील, तसेच अशोक मादिरे, बंडू माझिरे, दत्तात्रय माझिरे, शंकर भिलारे, ज्ञानोबा माझिरे, भरत माझिरे, राजेंद्र हुलावळे, अंकुश माझिरे, आकाश माझिरे, चिंतामन भरम, अशोक शिंदे, ज्ञानोबा भरम, यशवंत निकाळजे, रामचंद्र भरम, उत्तम भरम, भाऊ भरम, इ. ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या घराजवळच कमी जागेत लवकर पिकणाऱ्या हिरव्यागार पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या भोपळा, काकडी, दोडका, कारले, गवारी, भेंडी, मिरची, घेवडा यांसह १३ विवीध भाज्या व फळभाज्यांची बियांचे यावेळी वाटप करण्यात आले. रोटरी क्लबच्या वतीने महाराष्ट्रातील दहा हजार शेतकऱ्यांना परसबागेत लावण्यासाठी बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कोहिनकर यांनी यावेळी बोलताना दिली.
शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, परंतु आज ग्रामीण भागांमध्ये शहरी भागांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. याकरिता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्येही परसबागेविषयी जागृती करायला हवी. शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या एका कोपऱ्यात परसबाग तयार केली पाहिजे. ही कामे रोजच्या कामातून थोडा वेळ काढून केल्यास आपले मन प्रसन्न राहते, तसेच मजुरीचीही बचत होते. असे यावेळी प्रकल्प प्रमुख अविनाश कोहिनकर यांनी सांगितले.
चौकट :
स्वामी विवेकानंद विद्यालयाचे विद्यार्थी आपल्या पालकांच्या बरोबरीने या परसबाग प्रकल्पात सहभागी होत असून मुलांना शालेय जीवनातच नैसर्गिक शेती व पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले जात असल्याने आमच्या शाळेसाठी हा आगळा वेगळा प्रकल्प आहे. -
वसंत बोराडे, आयबीटी प्रमुख, स्वामी विवेकानंद विद्यालय, आसदे
फोटो - आसदे येथे रोटरी आयोजित परसबाग निर्मिती प्रशिक्षणात सहभागी स्वामी विवेकानंद शाळेचे विद्यार्थी व पालक.