रेल्वेचा गोंधळ कायम, तिस-या दिवशीही खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:45 AM2017-09-01T05:45:29+5:302017-09-01T05:45:58+5:30
मुंबईतील पाऊस आणि दुरंतो एक्सप्रेसला झालेल्या अपघातामुळे वळविलेली वाहतूक यामुळे दौंड -पुणे -मुंबई रेल्वे मार्गावरील गोंधळ तिसºया दिवशीही कायम होता़ पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक सुरळीत न झाल्याने गुरुवारी दौंड -पुणे मार्गावर ठिकठिकाणच्या स्थानकांवर
पुणे/केडगाव : मुंबईतील पाऊस आणि दुरंतो एक्सप्रेसला झालेल्या अपघातामुळे वळविलेली वाहतूक यामुळे दौंड -पुणे -मुंबई रेल्वे मार्गावरील गोंधळ तिसºया दिवशीही कायम होता़ पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक सुरळीत न झाल्याने गुरुवारी दौंड -पुणे मार्गावर ठिकठिकाणच्या स्थानकांवर अनेक रेल्वेगाड्या खोळंबल्या होत्या़ त्याचा परिणाम नोकरदार, विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे हाल झाले़ मुंबईहून डेक्कन क्वीनचा रेक बुधवारी न आल्याने गुरुवारी सकाळी पुण्याहून सुटणारी डेक्कन क्वीन रद्द करण्यात आली़ याशिवाय लांबपल्ल्यांच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींच्या वेळेत बदल करण्यात आला आहे़
पुणे रेल्वे स्थानकात झालेल्या रेल्वेच्या गर्दीमुळे गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे पाटस, कडेठाण, केडगाव, यवत, उरुळी, लोणी काळभोर प्रत्येक स्थानकावर एक्सप्रेस गाड्यासुद्धा पँसेंजर बनल्या होत्या. पुण्याकडे जाणा-या बारामती -पुणे पँसेंजर (५१४५२), पुणे-दौंड डेमु (७१४१०) या गाड्या रद्द झाल्या. तसेच दौंडकडे जाणाºया पुणे-बारामती पॅसेंजर (५१४५१), पुणे -दौंड डेमु (७१४०८) या गाड्या रद्द झाल्या. पुणे-मुंबई अप रेल्वेमार्ग अद्याप बंद असल्याने प्रशासनाने ६ एक्सप्रेस गाड्या मनमाड दौंडमार्गे वळवल्या. याचा परिणामही रेल्वेवाहतुकीवर झाला. दौंडवरुन पुण्याकडे जाणा-या डेमु लोकल, मनमाड पॅसेंजर, पटना एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस, महाराष्ट् एक्सप्रेस, बारामती पँसेंजर कमीत कमी २ ते ४ तास उशिरा धावल्या. पुण्यावरुन दौंडकडे जाणा-या हैद्राबाद एक्सप्रेस, नागरकोईल एक्सप्रेस या सुद्धा उशीरा धावल्या.
मुंबईहून पुण्यात डेक्कन क्वीन दाखल न झाल्याने गुरुवारी देखील ती रद्दच करण्यात आली. प्रगती, सिंहगड, इंटरसिटी, इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस नियोजित वेळेतच पुण्याहून मुंबईकडे रवाना झाल्या़ पुणे- कामाख्या एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस गुरुवारी रद्द करण्यात आल्या.
कन्याकुमारी-मुंबई एक्स्प्रेस, नागरकोईल एक्स्प्रेस शुक्रवारी रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सांगितले़ मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस, त्रिवेंदम -दादर एक्सप्रेस, एर्नाकुलम -पुणे, चिन्नई एगमोर -दादर तसेच अन्य काही गाड्यांची वेळ बदलण्यात आली.