पुण्याची दक्षता घेण्यासाठी 'अारअाेव्ही-दक्ष' राेबाे पुणे पाेलिसांच्या सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:38 PM2018-10-09T16:38:52+5:302018-10-09T16:56:47+5:30
अारअाेव्ही- दक्ष हा बाॅम्ब निकामी करणारा अत्याधुनिक राेबाे पुढील सहा महिन्यांसाठी पुणे पाेलिसांकडे असणार अाहे.
पुणे : डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट अाॅर्गनायझेशनचा (डीअारडीअाे) अारअाेव्ही- दक्ष हा बाॅम्ब निकामी करणारा अत्याधुनिक राेबाे पुढील सहा महिन्यांसाठी पुणे पाेलिसांकडे असणार अाहे. याबाबतचे ट्विट पुण्याचे पाेलीस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी केले अाहे.
डिअारडीअाे ने अारअाेव्ही- दक्ष हा राेबाे भारतीय सेनेसाठी विकसीत केला अाहे. याची खासियत म्हणजे सर्व प्रकारच्या घातक वस्तू या यंत्राच्या माध्यमातून शाेधता, हाताळता तसेच नष्ट देखील करता येतात. एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर हा राेबाे तीन तास सतत चालू शकते. हा राेबाे पुढील सहा महिने पुणे पाेलिसांकडे असणार असल्याने त्याचा माेठा फायदा पाेलिसांना हाेणार अाहे. व्यंकटेशम यांनी या राेबाेचे स्वागत करताना त्याची माहिती ट्विट करुन सर्वांना दिली अाहे. पुढील सहा महिने दक्ष शहराची सेवा करेल असेही त्यांनी अापल्या ट्विटमध्ये म्हंटले अाहे.
Meet the latest member of team @PuneCityPolice , ROV-DAKSH, a remotely operated robot, by DRDO, Pune, for bomb disposal. Daksh will be serving the city with us for the next six months #TechnologyOnDutypic.twitter.com/VQYyA2sNLO
— CP Pune City (@CPPuneCity) October 9, 2018
हा लांबून रिमाेटवर चालणारा राेबाे असून त्याद्वारे बाॅम्ब निकामी करता येणार अाहे. पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बाॅम्ब स्फाेटाची प्रकरणे समाेर अाल्याने पुण्यासाठी हा राेबाे एक वरदान ठरणार अाहे.