पुणेकरांवर ‘रॉयल’ची मोहिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 08:20 PM2018-08-28T20:20:28+5:302018-08-28T20:24:29+5:30
लष्करी वारशावर आधारीत ३५० एअरबोर्न ब्लू आणि स्टॉर्मरायडर सँड अशा दोन रंगात दुचाकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पुणे : रस्त्यावर मशिन गनसारखी धडधडत जाणाऱ्या रॉयल एन्फिल्डची जबरदस्त मोहीनी पुणेकरांवर पडली आहे. त्यामुळे शहरातून दर महिन्याला तब्बल १ हजार १०० ‘रॉयल’ वाहने रस्तावर येत असल्याची माहिती रॉयल एन्फिल्डकडून देण्यात आली. लष्करी रुबाब देणारी साडेतीनशे सीसी (क्युबिक कपॅसिटी) श्रेणीतील दोन नवीन वाहने चालकांना भुरळ घालण्यासाठी मंगळवारी (दि. २८) बाजारात दाखल झाली.
रॉयल एन्फिल्डच्या भारतीय सशस्त्र दलांना गेल्या ६५ वर्षांपासून (१९५२) दुचाकी पुरवित आहे. रॉयल एनफिल्ड आणि लष्कराचे एक भावबंध निर्माण झाले आहे. या नात्याला नमन करण्यासाठी लष्करी वारशावर आधारीत ३५० एअरबोर्न ब्लू आणि स्टॉर्मरायडर सँड अशा दोन रंगात दुचाकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रॉयल एन्फिल्डचे अध्यक्ष रुद्रतेज (रुडी) सिंग यांनी या दुचाकीचे अनावरण केले.
या मोटरसायकलची किंमत रुपये १ लाख ६१ हजार ९८४ (एक्स शोरूम, पुणे) रुपये आहे. या नवीन मोटरसायकलसोबत दुचाकी पोशाख, सामानाची पेटी तसेच स्टील इंजिन गार्डस यांच्यासह एकूण ४० मोटरसायकल अॅक्सेसरीज उपलब्ध असतील. त्या जोडीला ग्राहक मोटरसायकलच्या अस्सल अॅक्सेसरीज कलेक्शनमधून निवड करू शकतील. या अॅक्सेसरीज दोन वर्षांच्या वॉरंटीसह मिळतील. या शिवाय शर्ट, टी-शर्ट, कॅप, कॉलरवर लावायला ‘लेपल पीन्स’, बॅग आणि हेल्मेट देखील उपलब्ध आहेत.
सिंग म्हणाले, ‘मेड लाईक अ गन’ हे बोधवाक्य रॉयल एन्फिल्डमध्ये सार्थ केले आहे. भारतीय लष्कराशी १९५० च्या सुरुवातीपासूनच बंध जोडले गेले. आजमितीस सशस्त्र दलांना मोटरसायकल पुरविणारे आम्ही सर्वात मोठे पुरवठादार आहोत. त्यामुळे लष्करी थाटातील या नव्या श्रेणी सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.
--------------