शिरूरमध्ये निघाली शाही मिरवणूक
By admin | Published: February 21, 2017 02:01 AM2017-02-21T02:01:28+5:302017-02-21T02:01:28+5:30
शिवजयंतीनिमित्त शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तानाजी मालुसरे यांच्या वंशज प्रा. शीतल शिवराज मालुसरे
शिरूर : शिवजयंतीनिमित्त शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तानाजी मालुसरे यांच्या वंशज प्रा. शीतल शिवराज मालुसरे यांच्या उपस्थितीत शहरातून शिवरायांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी भगवे फेटे घालून मिरवणुकीत सहभाग घेतला. पुरुष व महिलांनी परिधान केलेले भगवे फेटे, भगवे झेंडे, सोबत तानाजी मालुसरे यांच्या वंशज व यातच आसमंत दणाणून सोडणाऱ्या ‘शिवाजीमहाराज की जय’ या घोषणा यामुळे अवघे शिरूर शिवरायमय झाले.
शहरात ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. पुण्यातील तरुणांनी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. सुमधुर गीत सादर करणारे बॅण्डपथक, ढोलताशा पथक व भजन मंडळ यामुळेही मिरवणुकीत रंगत आली.
नगराध्यक्षा वैशाली वाखारे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, नगरसेविका संगीता मल्लाव, उज्वला वारे, रोहिणी बनकर, नगरसेवक अभिजित पाचर्णे, विनोद भालेराव आदिशक्तीच्या अध्यक्षा शशिकला काळे, यशस्विनीच्या सचिव नम्रता गवारी, निर्मला अबूज, राणी कर्डिले, कोमल वाखारे, शिवसेनेच्या महिला तालुका संघटक विजया टेमगिरे, भूषण खैरे, सचिन जाधव, आलोक वारे, तुषार थोरात, राकेश परदेशी, योगेश जामदार, कौस्तुभ घोंगडे, वैभव काळे, योगेश फाळके, अक्षय धामने, मोहित माने यांच्यासह शहर व पंचक्रोशीतील तरुण, तरुणी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले.(वार्ताहर)