आर.पी.आय. (ए) तर्फे महावितरणला आंदोलनाचा इशारा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:13 AM2021-02-13T04:13:06+5:302021-02-13T04:13:06+5:30
कोरोनाकाळात व्यवसाय ठप्प असल्याने विजेची बिले थकली, तसेच महावितरणने वीजदर वाढवले. बहुतांश लोकांचे वीजबिले मोठ्याप्रमाणात थकली. मागील दोन दिवसांपासुन ...
कोरोनाकाळात व्यवसाय ठप्प असल्याने विजेची बिले थकली, तसेच महावितरणने वीजदर वाढवले. बहुतांश लोकांचे वीजबिले मोठ्याप्रमाणात थकली. मागील दोन दिवसांपासुन महावितरणने थेट वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम राबवली आहे. त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (ए) च्या पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी नीरा महावीतरण कार्यालयात वीज कनेक्शन कट करु नये तसेच देयक हप्त्यावर सूट मिळावी असे निवेदन दिले. अन्यथा पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
नीरा महावितरण कार्यालयात रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (ए) पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे, नीरेचे माजी उपसरपंच कुमार मोरे, रफिक शेख, नंदकुमार ढावरे, अशोक मोरे, संजय क्षीरसागर, सोनू वाघमारे, राजू रणदिवे, सिकंदर शेख आदींनी महावितरणचे सहायक अभियंता मनोज पाटील यांना निवेदन दिले.
लाॅकडाऊनच्या काळात लोकांना काम नव्हते. आता कुठे जनजीवन सुस्थितीत सुरु झाले आहे. शेतकऱ्यांची पीके जोमात आहेत. पिकांना पाण्याची गरज आहे. बाजारपेठेतील व्यवसाय आता सुरळीत होत आहेत. पण तीन महिने व्यवसाय बंद असल्याने वीजबिल भरणे शक्य झाले नाही. आता कोणतीही सूचना किंवा दवंडी न देता सरळ कनेक्शन कट करण्याचा सपाटा महावितरणने चालवला आहे. वाढीव वीजबिल व मोठ्या प्रमाणावर थकबाकीचे हप्त्यात भरणा करण्यस सवलत मिळावी, असे पत्र देण्यात आले.
नीरा (ता. पुरंदर) येथील महावितरणच्या सहायक अभियंता मनोज पाटील यांना निवेदन देताना आर.पी.आय.(ए)चे कार्यकर्ते.