डुकरेमळा व शेवगेमळा अंगणवाड्यांना १७ लक्ष रूपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:48+5:302021-02-06T04:18:48+5:30
पारगाव परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. या दोन्ही अंगणवाड्यांना इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. चौदा वर्षे प्रलंबित ...
पारगाव परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. या दोन्ही अंगणवाड्यांना इमारत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. चौदा वर्षे प्रलंबित राहिलेल्या या अंगणवाडीला जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी निधी मंजूर केल्यामुळे लहान मुलांची होत असलेली गैरसोय थांबणार असल्याचे उपसरपंच रामदास तट्टू यांनी सांगितले. तसेच या अंगणवाडी बांधकामासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. परंतु आमदार अतुल बेनके व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे इमारत बांधण्यासाठी गायरान गट नं ९५०/१ व २/१मध्ये दोन्ही अंगणवाड्यांसाठी एकूण ६ गुंठे जागा मंजूर झाल्याचे उद्योजक संभाजी चव्हाण यांनी सांगितले. उद्घाटनप्रसंगी सरपंच लता चव्हाण, माजी उपसरपंच शिवाजीराव डुकरे,उद्योजक संभाजी चव्हाण,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन डुकरे,मुख्याध्यापक अनिल फाफाळे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग डुकरे, विलास विश्वे, अंगणवाडीसेविका अनुराधा डुकरे,सरला बोऱ्हाडे, विकास बोरकर,प्रशांत तट्टू, मोतीराम डुकरे,शांताराम डुकरे,संदीप चव्हाण आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
.
पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथील अंगणवाड्यांचे भूमिपूजन करताना चिमुरडा विद्यार्थी श्रेयस डुकरे.