शहरात दोन ग्रेडसेपरेटरसाठी २८ कोटींच्या खर्चाला मान्यता
By Admin | Published: June 1, 2017 02:24 AM2017-06-01T02:24:04+5:302017-06-01T02:24:04+5:30
शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३५ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३५ कोटी ६० लाख ९२ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये रहाटणी परिसरात दोन ग्रेडसेपरेटर उभारण्यासही मंजुरी देण्यात आली.
स्थायी समिती सभागृहात बुधवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावर साई चौक (जगताप डेअरी) रहाटणी येथे दोन समांतर विलगक (ग्रेडसेपरेटर) बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे २८ कोटी ३६ लाख ९१ हजार रुपयांच्या, महापालिकेच्या जोतिबा उद्यान देखभाल संरक्षण करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३३ लाख ९६ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
आरोग्य विभागास ४.५ घनमीटर क्षमतेचे बीन्स कंटेनर खरेदी करण्यासाठी सुमारे १ कोटी ७५ लाख ९५ हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक १६ मधील नाल्याची कामे अंतर्गत नाल्याच्या भिंतीची उंची वाढवणे व जाळ्या बसविण्यासाठी येणाऱ्या सुमारे ३० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
खराळवाडी येथील आरक्षण क्रमांक १०२ व १०३ येथे उद्यान विकसित करण्यासाठी १ कोटी ८० लाख ९७ हजार रुपये खर्चाचा विषय स्थायी समितीच्या या बैठकीत मंजूर झाला. सांगवी परिसरात नवीन मुख्य वितरण नलिका टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे २५ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जुनी सांगवी पाणी पुरवठ्यासाठी परिसरात नवीन मुख्य वितरण नलिका टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे २४ लाख ८७
हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३ येथील वीजभार वाढविण्याकरिता २२ के. व्ही. फीडरसाठी सुमारे ३८ लाख ६१ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कर्मचाऱ्यांकरिता गणवेश खरेदी
पांजरपोळ नवीन टाकी ते चक्रपाणी वसाहत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी ५८ लाख २३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. गवळीनगरमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी ३८ लाख ४० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या या बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकरिता गणवेश कापड खरेदीसाठी १ कोटी १ लाख ९० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.