ज्येष्ठ नागरिकाला ३४ लाख रुपयांचा गंडा
By admin | Published: June 29, 2017 03:41 AM2017-06-29T03:41:14+5:302017-06-29T03:41:14+5:30
वडिलांच्या निधनानंतर महिलेच्या नावावर ठेवलेली ६.५ मिलियन डॉलरची रक्कम ई-मेल व मेसेज पाठवून तसेच एका कंपनीकडून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वडिलांच्या निधनानंतर महिलेच्या नावावर ठेवलेली ६.५ मिलियन डॉलरची रक्कम ई-मेल व मेसेज पाठवून तसेच एका कंपनीकडून बक्षीस लागल्याचे आमिष दाखवत एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला पाच विदेशी नागरिकांनी तब्बल ३४ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .
भाऊसाहेब माने (६२, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्यानुसार, फिलीप रिचर्ड, लीला इंडिसा, मोहम्मद हाजी, फादर अँडरसन, सोनिया मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लीला इड्रिसा हिचे वडील १६ वर्षांपूर्वी निधन पावले आहेत. तिच्या नावावर ६.५ मिलियन डॉलर ठेवले आहेत. मात्र, ते मिळवण्यासाठी एका परदेशी नागरिकाची गरज असल्याचा त्यांच्या कंपनीचा ई-मेल व मोबाईल क्रमांकावर मेसेज आला. त्यांना तुमचे बक्षीस मिळवण्यासाठी कस्टम ड्युटी, मनी कन्व्हर्शन फी, वकील फी अशी रक्कम भरण्यास सांगितली. त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या बँकेत हे पैसे भरले.