...केवळ ७६ शाळांना ५ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:09 AM2021-05-06T04:09:59+5:302021-05-06T04:09:59+5:30
संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याचा ‘मेस्टा’चा इशारा बारामती ...
संस्थाचालक, शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत
संस्थाचालक, शिक्षक,
शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत
जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
करण्याचा ‘मेस्टा’चा इशारा
बारामती : पुणे जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मागील दोन वर्षांपासूनचे आरटीई प्रतिपूर्ती शुल्काचे सुमारे ९०० शाळांचे १५० कोटी परतावा शुल्क असताना केवळ ७६ शाळांना ५ कोटी रुपये वितरित केले आहेत. संचारबंदीमुळे शाळा बंद असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील सुमारे २० हजार शिक्षक, शिक्षकतेर कर्मचारी यामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे आठ दिवसांत विनाअट सर्व शाळांची रक्कम पूर्तता करण्यात यावी; अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन दाखल करण्यात येणार आहे, असा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (मेस्टा) पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश सांगळे यांनी दिला आहे.
शाळांना प्रतिपूर्ती शुल्काबाबत एक वर्षाच्या आत परतावा देणे बंधनकारक आहे. मात्र, शासनाकडून २०१८ /१९ चे पन्नास टक्के रक्कम बाकी आहे. १९/२० ची संपूर्ण रक्कम तसेच २०/२१ ची संपूर्ण रक्कम अशी सुमारे १५० कोटी रुपये प्रलंबित आहेत. इंग्रजी माध्यमांच्या जिल्ह्यातील सुमारे ९३० शाळा ह्या शालेय फी व आरटीई परतावा यावरच अवलंबून असतात. मात्र, इतर जिल्ह्यात परतावा शुल्क विनाविलंब मिळत असताना पुणे जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडुन विलंब केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या लालफितीच्या कारभारामुळे अडचणी निर्माण होत आहेत. तपासणी करून देयके तयार झाली; मात्र अद्याप परतावा मिळाला नाही. त्यामुळे संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत आले आहेत. राज्यात कोरोना संसर्ग फैलाव टाळण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा ह्या शालेय फी व आरटीई परतावा यावरच अवलंबून असतात; मात्र जिल्ह्यातील तीन वर्षांचे सुमारे १५० कोटी रुपये थकल्याने शाळांबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार थांबले आहेत. शाळांनी प्रवेश प्रकियेत नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली. मात्र, शासनाकडे पाठपुरावा करूनही प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. त्यामुळे प्रलंबित कार्यवाही न झाल्यास संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील संस्थाचालक आंदोलन करणार आहेत.
जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय माळशिकारे, कोषाध्यक्ष अॅड. रवींद्र पोमणे, बारामती तालुकाध्यक्ष राहुल बनकर, दौंड तालुकाध्यक्ष मछिंद्र कदम, भोर तालुकाध्यक्ष दत्तात्रेय साळवी, पुरंदर तालुकाध्यक्ष बाळासाहेब झगडे, इंदापूर तालुकाध्यक्ष दादासाहेब शिरसट, खेड तालुकाध्यक्ष शीतल टिळेकर, संघटक संग्राम मोकाशी यांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.