जुन्नरच्या विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांच्या कामांना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:14 AM2021-06-16T04:14:57+5:302021-06-16T04:14:57+5:30
या कामांमध्ये उच्छिल अंतर्गत केदारेश्वर मंदिर ते आनंदवाडी रस्ता डांबरीकरण २० लक्ष, आंबोली अंतर्गत मिनेश्वर रस्ता कॉंक्रिटीकरण १५ लक्ष, ...
या कामांमध्ये उच्छिल अंतर्गत केदारेश्वर मंदिर ते आनंदवाडी रस्ता डांबरीकरण २० लक्ष, आंबोली अंतर्गत मिनेश्वर रस्ता कॉंक्रिटीकरण १५ लक्ष, निरगुडे अंतर्गत रामवाडी रस्ता डांबरीकरण २० लक्ष, हडसर अंतर्गत पेठेची वाडी ते मुंढे गवारी वस्ती रस्ता १० लक्ष , नेतवड येथे ग्रामसचिवालय बांधणे २० लक्ष, डिंगोरे रा. मा. २२२ ते गोटुंबी कालवा रस्ता २० लक्ष, पांगरी माथा माळवाडी रस्ता ते ताम्हाणेमळा रस्ता २० लक्ष, उदापूर भैरवनाथ मंदिर ते नेतवड माळवाडी जोड रस्ता ३० लक्ष , कुमशेत येथील इनाम वस्ती रस्ता डांबरीकरण १० लक्ष , पिंपळगाव सिद्धनाथ गणेशखिंड ते पानसरेवाडी रस्ता २० लक्ष , डिंगोरे पाणेश्वर मंदिर येथे सभा मंडप बांधणे १० लक्ष, मांडवे वरडीनाथ मंदिर येथे सभामंडप बांधणे ५ लक्ष ,हिवरे बु. भोरवाडी येथे सभागृह मुख्य चौक २० लक्ष, कोल्हेवाडी भैरवनाथ मंदिर येथे सभा मंडप बांधणे ५ लक्ष, बेलसर येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे २० लक्ष, आपटाळे येथे बहुउद्देशीय सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष, सुराळे येथे सामाजिक सभागृहास संरक्षक भिंत बांधणे १० लक्ष, कोपरे हागवणेवाडी काळुबा वस्ती रस्ता ५ लक्ष, घंगाळदरे येथील वरसुबाई मंदिराजवळ जागेस संरक्षक भिंत बांधणे १५ लक्ष, गुंजाळवाडी आर्वी येथील स्मशानभूमी रस्ता कॉंक्रिटीकरण २० लक्ष, गुंजाळवाडी आर्वी येथे बहुउद्देशीय सभागृह बांधणे २० लक्ष, गुंजाळवाडी आर्वी येथील गगनगिरी रोड म्हाळुंगे रस्ता डांबरीकरण २० लक्ष, राजुरी एन एच ६६ ते उपळीमळा रस्ता मजबुतीकरण ३० लक्ष, काटेडे येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण २० लक्ष, निमगाव तर्फे म्हाळुंगे येथील कुलस्वामिनीनगर ते निमगिरी रस्ता व धडगे ते समर्थ नगर रस्ता २० लक्ष, येणेरे येथे ताजणे वस्ती कुसुर जोड रस्ता १५ लक्ष, येणारे येथील काटेडे शिव ते दत्त कॉलनी मार्ग वडज धरण रस्ता २० लक्ष, येणेरे येथे मांजरवाडी गोल्या डोंगर मार्ग शेडपिंपळ रस्ता २० लक्ष, ओतूर कपर्दिकेश्वर मंदिर स्टेडियम सुशोभिकरण २० लक्ष, हिवरे खुर्द लोकेश्वर मळा रस्ता १० लक्ष अशा ३० कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन पावसाळा संपल्यानंतर ही कामे सुरू होणार असल्याचे आ. अतुल बेनके यांनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला असल्याचेही आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.