पुण्यात १९ हजार ठेवीदारांची ५७५ कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:09 AM2019-01-20T04:09:25+5:302019-01-20T04:09:37+5:30
कष्टाने जमविलेला पैसा चांगल्या परताव्याच्या आशेने गुंतविणाऱ्या ठेवीदारांच्या ठेवी असुरक्षित झाल्या आहेत.
- सनील गाडेकर
पुणे : कष्टाने जमविलेला पैसा चांगल्या परताव्याच्या आशेने गुंतविणाऱ्या ठेवीदारांच्या ठेवी असुरक्षित झाल्या आहेत. पुण्याच्या विशेष न्यायालयात सध्या सुरू असलेल्या खटल्यांत तब्बल १९ हजार ठेवीदारांची पावणे सहाशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे खटले सुरू आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडे यासंदर्भात अजूनही तक्रारी येत आहेत. यामध्ये पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि मुंबईतील गुंतवणूकदारांचा समावेश आहे.
डीएसके, टेम्पल रोज, बिटकॉईन, रॉयल टिष्ट्वंकल स्टार क्लब, फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर, विघ्नहर नागरी सहकारी पतसंस्था, समृद्ध जीवन, हिरा गोल्ड, संस्कार ग्रूप, कल्याणी नागरी पतसंस्था, रायसोनी अशा ठिकाणी पैसे गुंतवणारे हजारो ठेवीदार जेरीस आले आहेत. सध्या एकूण ८५ कंपन्या, पतसंस्था व गुंतवणुकीच्या योजना चालविणाºयांवर महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) विशेष न्यायालयात खटले सुरू आहेत. गेल्या वर्षात तब्बल १९ हजार ठेवीदारांची पावणे सहाशे कोटींची फसवणूक झाली. त्यातील २२ आरोपींना अटक करण्यात आली असून आर्थिक गुन्हे शाखेने ३ हजार ३९५ कोटींच्या मालमत्ता संरक्षित केल्या आहेत.
नागरिकांचा एक गट स्थापन करून त्यांच्याकडून ठेवी स्वीकारायच्या आणि आलेले पैसे व्यवसायात गुंतवून त्यातील फायदा ठेवीदारांना द्यायचा, असा फंडा वापरला जात होता.
>गुुंतवणूकदारांना गंडा
प्रकरण रक्कम कोटीत
डीएसके ३०००
संस्कार ग्रुप १५
टेम्पल रोझ ४००
रॉयल ट्विंकल
स्टार क्लब ४१
फडणीस इन्फ्रास्ट्रक्चर १३
विघ्नहर नागरी
पतसंस्था ३
हिरा गोल्ड १.६५