आंबेगाव क्रीडा संकुलाच्या संरक्षक भिंतीसाठी ७१ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:08 AM2021-07-22T04:08:25+5:302021-07-22T04:08:25+5:30
सोबतच संकुलातील अद्ययावत व्यायाम शाळेतील सात लाख रुपये किमतीचे नवीन व्यायाम साहित्य व ९ लाख रुपये किमतीच्या कबड्डीच्या दोन ...
सोबतच संकुलातील अद्ययावत व्यायाम शाळेतील सात लाख रुपये किमतीचे नवीन व्यायाम साहित्य व ९ लाख रुपये किमतीच्या कबड्डीच्या दोन मॅटसचे सेट या सर्व क्रीडा साहित्यांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
आंबेगाव तालुका क्रीडा संकुल मंचर या ठिकाणच्या आरोग्य सुविधांचा वापर तालुक्यातील अनेक नागरिक करत आहेत. यावेळी सुरक्षिततेसाठी ही संरक्षक भिंत बांधली जाणे अत्यंत महत्त्वाची बाब होती.शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर वळसे पाटील यांनी त्वरित निधी उपलब्ध करून या भिंतीचे काम सुरु झाले. यावेळी प्रांताधिकारी सारंग कोडोलीकर,तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पंचायत समिती उपसभापती संतोष भोर, क्रीडा संकुल समिती सदस्य ॲड.राहुल पडवळ, मंचर ग्रामपंचायत सदस्य कबड्डी खेळाडू लक्ष्मण थोरात, क्रीडा संकुल व्यवस्थापक समीर ढेरंगे, जिल्हा क्रीडा अधिकारी रमेश बागुल, तालुका क्रीडा अधिकारी आत्मसिद्ध सोनलकर आदी उपस्थित होते.
क्रीडा संकुल परिसरात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या संरक्षक भिंतीचा उपयोग होणार असून अत्याधुनिक व्यायाम साहित्य व कबड्डी मॅटचे सेट यांचा उपयोग तालुक्यातील आरोग्य प्रेमी नागरिक व होतकरू खेळाडूंना होणार आहे.