Pune Crime: ऑनलाइन कामाचे ८८ रुपये पाठवले अन् ३ लाख रुपये हडपले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 17:45 IST2023-11-03T17:45:33+5:302023-11-03T17:45:41+5:30
याप्रकरणी सतीश दिनकर देशपांडे (वय ६८, रा. सिंहगड रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे....

Pune Crime: ऑनलाइन कामाचे ८८ रुपये पाठवले अन् ३ लाख रुपये हडपले
पुणे : पार्ट टाइम नोकरीच्या नावाखाली दिलेले काम पूर्ण केल्यावर चांगला नफा मिळेल असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सतीश दिनकर देशपांडे (वय ६८, रा. सिंहगड रोड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार ९ मे २०२३ ते ३१ मे २०२३ यादरम्यान घडला. फिर्यादीत म्हटल्यानुसार, तक्रारदार यांना अज्ञात मोबाइल क्रमांकावरून मेसेज आला. दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळेल असे सांगून तक्रारदार यांना लिंक पाठवली. सुरुवातीला ८८ रुपये कमिशन देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. प्रत्यक्षात पैसे काढण्यासाठी गेले असता तक्रारदार यांचे पैसे निघत नसल्याने त्यांनी विचारणा केली. लेट फी, टॅक्स, बँक चार्जेस, पेनल्टी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रादार यांच्याकडून एकूण ३ लाख २३ हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पर्वती पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक खोमणे करत आहेत.