ओतूर येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनीसाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:10 AM2021-04-01T04:10:28+5:302021-04-01T04:10:28+5:30

याबाबत माहिती देताना जि. प. सदस्य मोहित ढमाले म्हणाले की, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा सर्वसाधारण निधी अर्थसंकल्प कामी वितरित ...

Rs 90 lakh sanctioned for cremation at Ootur cemetery | ओतूर येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनीसाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर

ओतूर येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनीसाठी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर

Next

याबाबत माहिती देताना जि. प. सदस्य मोहित ढमाले म्हणाले की, जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा सर्वसाधारण निधी अर्थसंकल्प कामी वितरित करणे, त्यामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबतच्या सध्याच्या प्रचलित कार्यपद्धतीमध्ये बदल करून यापुढे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा निधी अर्थसंकल्पित करणे, तरतुदीचे वितरण व प्रशासकीय मान्यता प्रदान करणे, तसेच पुर्नियोजना करणे. या निर्णयानुसार हे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत

त्यानुसार जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी पुणे यांनी ओतूर येथील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी बसविण्यासाठी एकूण ९० लाख रुपये मंजूर केले आहेत. यातील ६० लाख रुपये यांत्रिकी कामासाठी व ३० लाख रुपये प्रत्यक्ष बांधकामासाठी वापरण्यात येणार आहेत.

ओतूर स्मशानभूमीत गॅसदाहिनीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यापूर्वी जागा निश्चित करण्यासाठी जि. प. सदस्य मोहित ढमाले, जुन्नर पंचायत समिती सभापती विशाल तांबे, सरपंच गीता पानसरे उपसरपंच प्रेमानंद अस्वार ग्रामपंचायतचे सर्व विद्यमान सदस्य, ग्रामस्थ या जागेची पाहाणी करणार आहेत. यासाठी वास्तुविशारद अजित जालंधर जाधव यांना गॅसदाहिनीचा आराखडा बनविण्यासाठी सांगितले आहे.

--

फोटो ३१ओतूर गॅसदाहिनी

सोबत : ओतूर येथील नियोजित गॅस शवदाहिनीचा आराखडा

Web Title: Rs 90 lakh sanctioned for cremation at Ootur cemetery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.