'लतादीदी आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच...', मोहन भागवतांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 12:26 PM2022-02-28T12:26:21+5:302022-02-28T12:29:54+5:30

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत भागवत बोलत होते...

rss mohan bhagwat pays homage to lata mangeshkar in pune | 'लतादीदी आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच...', मोहन भागवतांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

'लतादीदी आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच...', मोहन भागवतांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

googlenewsNext

पुणे : देवदत्त स्वर लाभलेल्या लतादीदींचे अस्तित्व चिरंतन आहे. खडतर जीवनाचा धैर्याने सामना केलेल्या लतादीदी या आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच होत्या. त्यांचा हा वस्तुपाठ आपण आचरणात आणू शकलो तर ते आचरण हेच लतादीदींच्या अस्तित्वाची खूण असेल, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (mohan bhagwat) यांनी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांना रविवारी श्रद्धांजली अर्पण केली.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातर्फे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत भागवत बोलत होते. ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, गायक रूपकुमार राठोड, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित होते.

भागवत म्हणाले, शुचिता, अनुशासन, करुणा, खडतर तपश्चर्या या गुणांच्या आधारे त्यांनी प्रतिकूल जीवनही सुंदर बनवले. वडिलांच्या वाट्याला आलेल्या दुःखाची सल त्यांच्या मनात होती. मात्र, त्यामुळे कटुता येऊ न देता विधायक प्रतिक्रिया म्हणून त्यांनी वडिलांच्या नावाने रुग्णालय उभारले. गायनात त्या सर्वश्रेष्ठ होत्याच. परंतु, इतर अनेक गोष्टीतही त्यांनी योगदान दिले.

'स्वरमाऊली' लतादीदीचा मला ८० डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितली. वर्षे सहवास लाभला. पण, खरे तर मला ती समजलीच नाही. कुसुमाग्रजांच्याच शब्दात सांगायचे तर '...परंतू तुझ्या मूर्तीवाचून देवा मला वाटते विश्व अंधारले', अशीच तिच्या निधनाने माझी स्थिती झाली आहे, अशी भावना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.

बाबा गेल्यानंतर अवघ्या १३ वर्षाची दिदी आमची बाबा झाली. माई गेली तेव्हा ती आमची आई झाली. तुमच्यासाठी लता मंगेशकर गेल्या. आमच्यासाठी मात्र, आमचं सर्वस्वच गेलं. असे सांगताना आशा भोसले यांना अश्रू आवरता आले नाहीत.

गाणे सोडून हिंदू महासभेचे काम करावे, अशी इच्छा लतादीदींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याकडे व्यक्त केली होती. 'तू करत असलेले कार्य हिंदू महासभेचे आहे" हे सावरकर यांनी त्यांना समजावून सांगितले होते, अशी आठवण डॉ. धनंयज केळकर यांनी सांगितली.  डॉ. शंकर अभ्यंकर, प्रा. विश्वनाथ कराड यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. धनंजय केळकर यांनी प्रास्तविक केले.

Web Title: rss mohan bhagwat pays homage to lata mangeshkar in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.